agriculture news in Marathi, Shetkari sanghtna questioned to Agriculture minister on procurement and light bills | Agrowon

नाफेड खरेदी, वीजबिलाबाबत शेतकरी संघटनेचे कृषिमंत्र्यांना प्रश्न
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जानेवारी 2018

अकोला ः शासनाने उडदाची खरेदी बंद करण्याचे कारण काय? शेतकऱ्यांना वाढीव वीजबिले केव्हा दुरुस्त करून मिळणार? अशा प्रकारच्या विविध शेतकरी प्रश्नांबाबत शेतकरी संघटनेने कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले. श्री. फुंडकर हे तेल्हारा येथे दौऱ्यावर आले असताना शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत निवेदन दिले. तेल्हारा येथे शेतकरी संघटना तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर यांनी कृषिमंत्र्यांच्या शेतकरी समस्यांबाबत सविस्तर निवेदन  दिले. 

अकोला ः शासनाने उडदाची खरेदी बंद करण्याचे कारण काय? शेतकऱ्यांना वाढीव वीजबिले केव्हा दुरुस्त करून मिळणार? अशा प्रकारच्या विविध शेतकरी प्रश्नांबाबत शेतकरी संघटनेने कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले. श्री. फुंडकर हे तेल्हारा येथे दौऱ्यावर आले असताना शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत निवेदन दिले. तेल्हारा येथे शेतकरी संघटना तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर यांनी कृषिमंत्र्यांच्या शेतकरी समस्यांबाबत सविस्तर निवेदन  दिले. 

यात शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे बिले ही वाढवून आली आहेत. वीजवितरक कंपनीच्या रेकॉर्डमधील माहितीही देण्यात आली. ज्या फीडरवर अपेक्षेइतके युनिट विद्युत आलेली नसताना त्यापेक्षा कितीतरी पटीने बिल वाढवून देण्यात आली आहेत. याबाबत आकडेवारी उपलब्ध आहे.

यानुसार महावितरण कंपनीने राज्यातील सर्व ४१ लाख शेती कृषी वीजग्राहकांची मार्च २०१७ अखेरची मुद्दल थकबाकी १० हजार ८९० कोटी रुपये दाखविली आहे. सप्टेंबर २०१७ अखेर ही रक्कम अंदाजे १२ हजार ५०० कोटी रुपये होते. व्याज व दंड व्याजासह ही रक्कम सप्टेंबर २०१७ अखेर २१००० कोटी रुपये असल्याचे सांगत आहे. प्रत्यक्षात जितकी वीज शेतकऱ्यांना मिळाली आहे, त्या सर्व विजेची निश्चित केलेल्या दराने संपूर्ण रक्कम कंपनीस राज्य शासनाचे सबसिडी आणि व्यापारी उणे क्रॉस सबसिडीमधून मिळाली आहे. किंबहुना जास्त मिळत आहे आणि परंतु महावितरण कंपनी शेतकऱ्याला वीजबिल वाढवून देत आहे. यामधून कंपनी आपला भ्रष्टाचार लपवत आहे, असा आरोप करण्यात केला.

तसेच अकोट येथे २०० शेतकऱ्यांचे मोजमाप व्हायचे आहे. नाफेडने हा उडीद खरेदी करावा, वाण प्रकल्पामधील पाणी आरक्षित करू नये ही मागणी केली. यावर कृषिमंत्र्यांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिले. या वेळी लक्ष्मीकांत कौठकर यांच्यासह तेल्हारा युवा आघाडी नीलेश नेमाडे, अकोट युवा आघाडी विक्रांत बोन्द्रे, दिनेश गिर्हे, सुरेश सोनोने, जाफर खा आमद खाँ, दादा टोहरे, रोशन गायगोल, गणेश इंगळे, गोपाळ गेबड, मोहन पोटदुखे, सुरेंद्र सोनटक्के, मयूर गावंडे, देवेंद्र गावंडे, अरुण फसाळे, विजय रेवतकर, किशोर वानखडे, शरद सोनटक्के यांच्यासह इतर उपस्थित होते.
 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...