agriculture news in Marathi, Shetkari sanghtna will agitate if Milk rate will not increased, Maharashtra | Agrowon

दूध दरवाढ द्यावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा शेतकरी संघटनेचा इशारा
टीम अॅग्रोवन
रविवार, 31 डिसेंबर 2017

पंढरपूर, जि. सोलापूर  ः सरकारने अनेक वेळा आश्‍वासन देऊनही शेतकऱ्यांना दूध दरवाढ मिळाली नाही. त्यामुळे सरकार व दुग्ध विकासमंत्र्यांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विश्‍वासघात झाला आहे. एक जानेवारीपासून शेतकऱ्यांना दूध दरवाढ द्यावी, अन्यथा सरकारच्या विरोधात सुकाणू समितीच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकर यांनी शनिवारी (ता. ३०) दिला.

पंढरपूर, जि. सोलापूर  ः सरकारने अनेक वेळा आश्‍वासन देऊनही शेतकऱ्यांना दूध दरवाढ मिळाली नाही. त्यामुळे सरकार व दुग्ध विकासमंत्र्यांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विश्‍वासघात झाला आहे. एक जानेवारीपासून शेतकऱ्यांना दूध दरवाढ द्यावी, अन्यथा सरकारच्या विरोधात सुकाणू समितीच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील घाटणेकर यांनी शनिवारी (ता. ३०) दिला.

गाईच्या दुधाला तीस रुपये व म्हशीच्या दुधाला ५० रुपये प्रती लिटर दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पिलीव (ता. माळशिरस) येथे शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान श्री. घाटणेकर यांनी राज्य सरकारच्या दूध धोरणावर टीकास्त्र सोडले.

यावेळी श्री. घाटणेकर म्हणाले, शेतीमालाला हमीभाव नाही, उसाला कारखाने योग्य दर देत नाहीत, म्हणून शेतकरी दूध उत्पादनाकडे वळले आहेत. आता दुधालाही दर मिळत नसल्याने दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला दरवाढ मिळावी यासाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन केले जाईल.

यावेळी माऊली हळणवर, प्रा. जयंत बगाडे, अजित बोरकर, माऊली जवळेकर, रमेश पाटील आदींची भाषणे झाली. या वेळी शहाजहान शेख, माळशिरस अजित बोरकर, धनंजय मदने आदीं उपस्थित होते.

 आंदोलनादरम्यान दोन्ही बाजूने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. स्थानिक पोलिस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...