वाल
काढणी अवस्था
बाजारभाव बातम्या
सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २०) शेवगा, वांगी, दोडका तेजीत असून फ्लॅावर, वाटाणा, पावटा, मेथी, कोथिंबिरीच्या आवकेत वाढ झाली आहे. शेवग्याची ११ क्विंटल आवक झाली असून, शेवग्यास दहा किलोस ५०० ते ६०० असा दर मिळाला आहे. शेवग्यास दहा किलो मागे रविवारच्या (ता. १८) तुलनेत शंभर रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे.

वांग्याची ३५ क्विंटल आवक झाली. वांग्यास दहा किलोस २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. दोडक्याची सहा क्विंटल आवक झाली असून दहा किलोस २०० ते २५० असा दर मिळाला आहे. वांगी व दोडक्यास दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. गवारीची १५ क्विंटल आवक होऊन दहा किलो गवारीस २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. भेंडीची २० क्विंटल आवक झाली असून दहा किलो भेंडीस २८० ते ३२० असा दर मिळाला आहे. हिरवी मिरचीची ३५ क्विंटल आवक झाली असून, दहा किलो मिरचीस १३० ते १८० असा दर मिळाला आहे.
आल्याची सहा क्विंटल आवक होऊन दहा किलोस ५५० ते ६२० असा दर मिळाला आहे. काळा घेवड्याची तीन क्विंटल आवक होऊन दहा किलो घेवड्यास ३८० ते ४२० असा दर मिळाला आहे. फ्लॅावर, वाटाणा, पावटा, मेथी, कोथिंबिरीच्या आवकेत वाढ झाली आहे. फ्लॅावरची ४१ क्विंटल आवक झाली असून, दहा किलो फ्लॅावरला ५० ते ८० असा दर मिळाला आहे.
वाटाण्याची १२ क्विंटल आवक झाली असून, दहा किलो वाटाण्यास ७०० ते ८०० असा दर मिळाला आहे. पावट्यास २२ क्विंटल आवक होऊन दहा किलो पावट्यास २२० ते ३०० असा दर मिळाला आहे. मेथीची २५०० जुड्यांची आवक होऊन मेथीस शेकड्यास ६०० ते ७०० असा दर मिळाला. कोथिंबिरीची २२०० जुड्यांची आवक झाली असून, कोथिंबिरीस शेकड्यास २०० ते ४०० असा दर मिळाला आहे.
- 1 of 22
- ››