agriculture news in marathi, Shevgaon, Pathardi water problem is solved | Agrowon

शेवगाव, पाथर्डीचा पाणीप्रश्न मिटला
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

शेवगाव, जि. नगर : गेल्या चार दिवसांपासून नाशिक व नगर जिल्ह्यांत झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे गुरुवार (ता. २३) पर्यंत धरणात ३८.५० टक्के पाणीसाठा झाला होता. पाण्यात वाढ झाल्याने शेवगांव-पाथर्डी तालुक्‍याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

शेवगाव, जि. नगर : गेल्या चार दिवसांपासून नाशिक व नगर जिल्ह्यांत झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे गुरुवार (ता. २३) पर्यंत धरणात ३८.५० टक्के पाणीसाठा झाला होता. पाण्यात वाढ झाल्याने शेवगांव-पाथर्डी तालुक्‍याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

नाशिक, नगर, औरंगाबाद जिल्‍ह्यातील वीसपैकी चौदा धरणे जवळपास शंभर टक्के भरण्याचा मार्गावर आहेत. त्यातील काही धरणे शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे येथून पुढे होणाऱ्या पावसाचे पाणी जायकवाडी धरणात येणार असल्याने यावर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरू शकते, असा अंदाज अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

निळवंडे, दारणा, गंगापूर, भंडारदरा, ओझर, नांदुरमधमेश्वर जायकवाडीत आवक सुरू आहे. धरणात जेवढा जास्ती पाणीसाठा होईल तेवढा शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्‍याला फायदा होतो. आता बराचसा पाणीसाठा झाल्याने शेवगाव, पाथर्डी तालुक्‍यांचा पिण्याच्या पाण्याचा व धरण परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पाण्याची पातळी वाढत चालल्याने धरण फुगवट्यावर शेतासाठी बसविलेले विद्युत पंप काढून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरवात केली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी गाळपेर जमिनीवरती ऊस, कापसाची लागवड केली होती ती पाण्यात जावू लागली आहेत.

इतर बातम्या
वऱ्हाडातील बाजारपेठेत पावसाअभावी...अकोला ः  खरीप तोंडावर आलेला असतानाही...
निताने येथे वीजवाहक तारांच्या... नाशिक  : बागलाण तालुक्यातील निताने येथील...
'वसाका'ची चाके पुन्हा फिरणारनाशिक : वसंतदादा साखर कारखाना, ''धाराशिव''...
‘जानेफळ येथे सोयाबीन पेंड प्रक्रिया...अकोला ः सोयाबीन पेंड प्रक्रिया उद्योग सुरू करून...
अमरावती जिल्ह्‍यात कर्जवाटपात...अमरावती ः जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...नाशिक  : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...
फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई तीव्र फुलंब्री, जि. औरंगाबाद : सततच्या...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
जालना जिल्ह्यात शेततळ्यांच्या...जालना : सामूहिक शेततळ्यांचे उद्दिष्ट जालन्याच्या...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा साडेआठशे नगर : जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...
सांगलीतील आवर्तन बंद होण्याची शक्यतासांगली : वारणा आणि कोयना धरणांतील पाण्याची पातळी...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...पुणे : मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यात...
नांदेड जिल्ह्यात नऊ हजार जमीन...नांदेड  : राष्ट्रीय शाश्वत शेती...
लोकसहभागातून ग्रामविकास अभियान :...सोलापूर  : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या...
नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या...नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध...
आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी...पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग...
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले...परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात...