agriculture news in marathi, Shindhudurg Alphanso Harvesting season in last stage | Agrowon

सिंधुदुर्गात हापूस हंगाम अंतिम टप्प्यात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात हापूस आंबा हंगाम अंतिम टप्प्यात पोचला आहे. पश्‍चिम पट्ट्यातील आंबा हंगाम २५ मेपर्यंत  चालेल, असा अदांज आहे. मात्र पूर्व पट्ट्यात अजूनही आंबा हंगामाला म्हणावी तशी सुरवात झाली नसून, १५ मेनंतर सुरवात होणार आहे. पाऊस लांबला तरच या भागातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात हापूस आंबा हंगाम अंतिम टप्प्यात पोचला आहे. पश्‍चिम पट्ट्यातील आंबा हंगाम २५ मेपर्यंत  चालेल, असा अदांज आहे. मात्र पूर्व पट्ट्यात अजूनही आंबा हंगामाला म्हणावी तशी सुरवात झाली नसून, १५ मेनंतर सुरवात होणार आहे. पाऊस लांबला तरच या भागातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल.

सततचे ढगाळ वातावरण आणि त्यामुळे फुलकिड्यां(थ्रीप्स)चा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे या वर्षी आंबा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घसरण होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देवगड परिसरातून सरासरी ४५ ते ५० टन आंबा उत्पादित झाला होता. त्या तुलनेत या वर्षी आंब्याचे प्रमाण कमी आहे. या वर्षी सरासरी ३५ हजार टन आंबा उत्पादन होईल, अशी आंबा बागायतदारांना अपेक्षा आहे.

आतापर्यंत या परिसरांतील २५ हजार टन आंबा देश-विदेशांतील विविध बाजारपेठांमध्ये पोचला आहे. अजूनही साडेआठ हजार टन आंब्याची काढणी शिल्लक आहे. २५ मे आंबा हंगाम चालेल असा अदांज आहे. जानेवारीपासून आंबा हंगामाला सुरवात होते. जानेवारी ते मार्च या कालावधीत बहुतांशी आंबा वाशी मार्केटमध्ये जातो, त्यानंतरचा आंबा हा स्थानिक बाजारपेठेसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगावसह देशातील विविध बाजारपेठांमध्ये पाठविला जातो.

सध्या आंबा हंगाम अंतिम टप्प्यात आहे, २५ मेपर्यंतच हा हंगाम चालेल असे आंबा बागायतदारांचे म्हणणे आहे. एकीकडे देवगड परिसरातील आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असताना जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यातील आंबा हंगामाला अजूनही म्हणावी, तशी सुरवात झालेली नाही. १५ मेनतंर या भागातील आंबा हंगामाला सुरवात होईल, अशी अपेक्षा आहे.

* शेतकऱ्याला मिळणारा सध्याचा दर- डझन ३०० ते ४०० रुपये
* बाजारपेठांमधील विक्रीचा दर- ५०० ते ६०० रुपये

इतर बातम्या
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
पाण्याअभावी होरपळली तुती; रेशीम उत्पादक...नांदेड : दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी...
हुमणी नियंत्रणासाठी सातारा कृषी...सातारा  : हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाने...
अमरावती जिल्ह्यातील नदीनाल्यांमध्ये...अमरावती : पावसाचे पाणी जमिनीत मुरून...
राणी सावरगाव येथील चारा छावणीत चौदाशेवर...परभणी  ः दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यात...
येवल्यातील ८० हजारांवर विहिरी कोरड्याठाकयेवला, जि. नाशिक : ब्रिटिशकालीन अवर्षणप्रवण अन्...
धनोली धरणाचे गेट तोडल्याने पाण्याचा...नाशिक   : कळवण तालुक्यातील धनोली येथील...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...
सेंद्रिय, विषमुक्त शेतीचा बांधापर्यंत...पुणे: सेंद्रिय व विषमुक्त शेती तंत्रज्ञानाचा...
SakalSaamExitPolls : कोकणात युतीचीच लाट...यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणचा बालेकिल्ला...
SakalSaamExitPolls : मुंबईत भाजप,...सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणानुसार, - मुबईत युतीला...
SakalSaamExitPolls : मराठवाड्यात युतीला...मराठवाड्यात भाजपला ०३, शिवसेनेला ०२, काँग्रेसला...
SakalSaamExitPolls : उत्तर महाराष्ट्रात...महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात भाजपचे 'कमळ' ५...
SakalSaamExitPolls : भाजपच्या...महाराष्ट्रातील विदर्भात काँग्रेसला ३ जागा...
SakalSaamExitPolls : पश्चिम...आघाडीच्या बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात...