agriculture news in marathi, Shirur loksabha fight will raise issues | Agrowon

शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍नांवर रंगणार लढत
गणेश कोरे
रविवार, 24 मार्च 2019

पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक नगरी’ असा लौकिक असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात शेती, बेरोजगारी, महामार्गावरील वाहतूक कोंडी या प्रश्‍नांवर निवडणूक लढली जात आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे अशी दुरंगी लढत होणार आहे. डॉ. कोल्हे यांच्या उमेदवारीने लढतीत रंगत आणली असून, खा. आढळराव यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे.  

पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक नगरी’ असा लौकिक असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात शेती, बेरोजगारी, महामार्गावरील वाहतूक कोंडी या प्रश्‍नांवर निवडणूक लढली जात आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे अशी दुरंगी लढत होणार आहे. डॉ. कोल्हे यांच्या उमेदवारीने लढतीत रंगत आणली असून, खा. आढळराव यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे.  

गेली तीन टर्म प्रतिनिधित्व करत असलेले खा. आढळराव यांच्या उमेदवारीवर शुक्रवारी (ता. २२) शिवसेनेने शिक्कामोर्तब केले. तर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने एन वेळी अभिनेते डॉ. कोल्हे यांना उमेदवारी देत पक्षातून तगडा उमेदवार दिला आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. आढळराव यांनी शिवनेरी ते वढू विजयी निर्धार यात्रा काढली होती. तर कोल्हे यांच्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भोसरी येथे सभा घेत प्रचाराचा नारळ वाढविला.

या मतदारसंघात जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर हे ग्रामीण आणि शेतीबहुल मतदारसंघाचा तर हडपसर आणि भोसरी या शहरी आणि औद्योगिक नगरी असलेल्या मतदारसंघाचा समावेश आहे. यामुळे शेती, बेरोजगारी आणि वाहतूक कोंडी या प्रश्‍नावर ही निवडणूक रंगणार आहे. गेल्या १५ वर्षात शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर विद्यमान खासदारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून होत आहे. तर आपण मतदारसंघात रस्ते, महामार्ग निर्मितीसाठी १४ हजार कोटींचा निधी आणल्याचा दावा खा. आढळराव यांच्याकडून करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नवख्या असलेल्या डॉ. कोल्हे यांच्या तुलनेत आढळराव यांचा या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून ती त्यांच्या जमेची बाजू आहे. गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून सर्वच तालुक्‍यांत संपर्क असलेल्या आढळराव यांच्या तुलनेत डॉ. कोल्हे यांच्यासमोर कमी दिवसांत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचे मोठे आव्हान आहे. तरीही यापूर्वी नेहमीच एकतर्फी होणारी व आढळराव यांना सहजसोपी वाटणारी यंदाची निवडणूक मात्र डॉ. कोल्हे यांच्या उमेदवारीमुळे अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

खा. आढळराव यांच्या जमेच्या आणि नकारात्मक बाजू 
जमेच्या बाजू

  • दांडगा जनसंपर्क
  • रस्ते विकासासाठी १४ हजार कोटींच्या निधीचा दावा
  • भाजपाबरोबर झालेल्या युतीमुळे फायदा 

नकारात्मक बाजू 

  • शेती प्रश्‍नांच्या अभ्यासाचा अभाव 
  • खेड विमानतळ पुरंदरला स्थलांतरित झाल्याचा रोष 
  • पुणे-नाशिक, नगर, सोलापूर महामार्गाचे रेंगाळलेले काम आणि वाहतूक कोंडी

डॉ. कोल्हे यांच्या जमेच्या आणि नकारात्मक बाजू 
जमेच्या बाजू 

  • शिवाजी, संभाजी यांच्या भूमिकांमुळे लोकप्रियता
  • नवीन चेहेरा
  • राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कुमक  

नकारात्मक बाजू 

  • शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेशामुळे होणारी टीका 
  • जनसंपर्काचा अभाव
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकदिलाने काम करणार का?

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...