देहूगाव-लोहगाव गटातून शिवसेनेच्या शैला खंडागळे विजयी

देहूगाव-लोहगाव गटातून शिवसेनेच्या शैला खंडागळे विजयी
देहूगाव-लोहगाव गटातून शिवसेनेच्या शैला खंडागळे विजयी

पुणे : सदस्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळल्याने रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या देहूगाव-लोहगाव गटाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या शैला खंडागळे १ हजार २३० मतांनी विजयी झाल्या. तिरंगी लढतीत शैला खंडागळे यांना एकूण ४२१६ मते, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मच्छिंद्र चव्हाण यांना २९८६ तर, काँग्रेसचे रूपेश चव्हाण यांना ७१५ मते पडली. 

पुणे जिल्हा परिषदेच्या हवेली तालुक्यातील गट क्र. ३५ देहू- लोहगाव गट अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या गटातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या मंगल नितीन जंगम यांचे सदस्यत्व रद्द ठरविण्यात आल्याने रिक्त झालेल्‍या जागेवर पोट निवडणूक झाली. निवडणुकीत एकूण ८ हजार ५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी १२७ मतदारांनी नकाराधिकार (नोटा) बजावला. सोमवारी (ता. २५) जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीतील महात्मा गांधी सभागृहात मतमोजणी करण्यात आली. 

हवेलीचे तहसीलदार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या निकालामुळे जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काॅंग्रेसची सदस्य संख्या एकने घटून ४३ झाली अाहे. तर शिवसेना सदस्यांची संख्या १४ झाली अाहे. जिल्हा परिषदेत काॅंग्रेसचे ७ सदस्य असून, बावडा-लाखेवाडी गटाच्या सदस्या रत्नप्रभा पाटील यांच्या निधनाने काॅंग्रेसचे एक सदस्यपद रिक्त झाले अाहे. तर भाजपचे ७ सदस्य लोकशाही क्रांती १, राष्ट्रीय समाजपक्ष १ आणि अपक्ष २ असे बलाबल अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com