‘पंदेकृवि’च्या शिवारफेरीला सुरवात

अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने अायोजित शिवारफेरीचे उद्‌घाटन कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले व शेतकऱ्यांच्या हस्ते झाले. शिवारफेरीदरम्यान कापसाच्या प्रक्षेत्रावर माहिती घेताना गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी. (छायाचित्र ः योगेश मानकर)
अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने अायोजित शिवारफेरीचे उद्‌घाटन कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले व शेतकऱ्यांच्या हस्ते झाले. शिवारफेरीदरम्यान कापसाच्या प्रक्षेत्रावर माहिती घेताना गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी. (छायाचित्र ः योगेश मानकर)
अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षी होणाऱ्या शिवारफेरीला बुधवारी (ता. २५) प्रारंभ झाला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांच्यासह शेतकऱ्यांच्या हस्ते या शिवारफेरीचे उद्‍घाटन झाले. 
 
विद्यापीठाने संशोधित केलेले विविध पीक वाण, शिफारशींचे प्रयोग व प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहता यावेत, त्यांच्या शंकांचे समाधान व्हावे, यासाठी दरवर्षी विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे अौचित्य साधून शिवारफेरीचे अायोजन केले जाते.
 
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विदर्भातील ११ जिल्ह्यांतील शेतकरी या कालावधीत भेट देऊन पाहणी करतात. या वर्षी कापूस, लिंबूवर्गीय फळे, ज्वारी, कडधान्य, तेलबिया, कोरडवाहू शेती, औषधी व सुगंधी वनस्पती, पशुसंवर्धन तथा दुग्ध व्यवसाय आदी विभागांसह डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्र, शेती मशागतीची यंत्रे व अवजारे, कापणीपश्चात तंत्रज्ञान, फळे व भाजीपाला लागवड, सेंद्रिय शेती विभागांना या शिवारफेरीदरम्यान भेटींचे अायोजन करण्यात अाले. सोबतच शेतीविषयक तांत्रिक चर्चासत्रसुद्धा झाले. 
 
सकाळी १० वाजता कुलगुरू डॉ. भाले, तसेच शिवारफेरीची पहिली नोंदणी करणारे दिलीपराव नानाजी पोहाने (हिंगणघाट, जि. वर्धा), वंदनाताई खंडारे (मूर्तिजापूर), अपर्णा कदम (अकोला) यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवारफेरीचे उद्‍घाटन झाले. शिवारफेरीच्या पहिल्या दिवशी बुलडाणा, वर्धा, गोंदिया व भंडारा या चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना निमंत्रित करण्यात अाले होते. 
 
या निमित्ताने बोलताना डॉ. भाले म्हणाले, विद्यापीठ हे सातत्याने काळानुरूप बदलांचा विचार करून संशोधनाची दिशा निश्चित करीत अाहे. शेतकऱ्यांना अार्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने नवनवीन वाण, यंत्र, तंत्रांचा शोध लावला जात अाहे.
 
शिवारफेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी या ठिकाणी यावे अाणि या संशोधनाची प्रत्यक्ष पाहणी करावी, या हेतूने ही शिवारफेरी अायोजित करण्यात येते. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यात सहभागी होऊन पाहणी करावी, असे अावाहनही त्यांनी शेवटी केले.  
 
शिवारफेरीत हे मिळतेय बघायला
  • कापूस संशोधन विभागात कापूस वाणांची प्रात्यक्षिके आणि सोबत तुलनात्मक अभ्यासाकरिता प्रचलित बीटी वाणांचे प्रात्यक्षिक दाखविले जात अाहे. या ठिकाणी अतिघनता लागवड पद्धत, रुंद वरंबा सरी पद्धत, देशी आणि संकरित वाणासह (AKA ५, AKA ७, AKA ८) (AKH०८१, PKV रजत, AKH८८२८, AKH९९१६) अमेरिकन वाणांचे प्रात्यक्षिक आहेत. देशी बीटी वाण PDKV JK 116 हे १५० दिवसांत येणारे बीजी टू प्रकारातील कापूस वाण सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत अाहे. 
  • ज्वारी संशोधन विभागात हुरड्याचे PDKV कार्तिकी, खरिपाचे सरळ वाण PDKV कल्याणी, CSH ३५ आदी नवीन वाणांसह ज्वारीची विविधता दर्शविणारे १५-२० प्रात्यक्षिके अाहेत. 
  • लिंबूवर्गीय संधोधन केंद्रामध्ये लिंबू व संत्रा पिकांच्या विविध जाती, ओलिताच्या तसेच नर्सरीमध्ये तयार करण्याच्या विविध पद्धतींसह उंच वरंबा वरील सघन संत्र लागवड, सेंद्रीय पद्धतीने संत्रा उत्पादनासह कीड रोग नियंत्रणाच्या विविध पद्धती, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन संत्रा, लिंबू उत्पादकांना दिशादर्शक ठरणारे आहे.
  • कडधान्य संशोधन विभागात कडधान्याचे सुधारित वाण व त्यांची वैशिष्ट्ये विषद करणारे प्रदर्शन मांडले अाहे. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com