agriculture news in marathi, ShivJayanti ceremony will be on Shivneri tommorow | Agrowon

शिवनेरीवर उद्या शिवजन्मोत्सव सोहळा
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर साेमवारी (ता.१९) शिवजन्मसाेहळाचे आयोजन करण्यात आले आहे.  या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत असून किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना विविध मंत्री उपस्थित राहणार आहेत. 

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर साेमवारी (ता.१९) शिवजन्मसाेहळाचे आयोजन करण्यात आले आहे.  या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत असून किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना विविध मंत्री उपस्थित राहणार आहेत. 

सोमवारी (ता. १९) सकाळी किल्ले शिवनेरीवर शिवाईमातेची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आणि जिल्हाधिकारी साैरभ राव यांच्या प्रमुख उपस्थितीत हाेणार आहे. यानंतर पालखी मिरवणूक हाेणार असून, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्माचा पारंपारिक साेहळा शिवजन्मस्थळी हाेणार आहे. यानंतर शिवकुंज येथील राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, मंत्री विनोद तावडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, मंत्री पंकजा मुंडे, दिलीप कांबळे, विष्णू सावरा, विजय शिवतारे आदींसह खासदार संभाजीराजे भाेसले, खा. उदयनराजे भाेसले, खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शरद साेनवणे आदी मान्यवर आणि लाेकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शिवनेरीवरील कार्यक्रमानंतर जुन्नर येथे सकाळी साडेअकरा वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीभूषण पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक... पुणे   ः रब्बी हंगामातील पिकांची...
पुणे जिल्ह्यात ११ हजार कांदा चाळींची...पुणे  ः कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यास...
तेवीस कारखान्यांकडून ७७ लाख ६३ हजार टन... औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
पुढील महिन्यापासून ‘समृद्धी’चे काम... वाशीम : नागपूर-मुंबई कृषी समृद्धी जलदगती...
‘वैद्यनाथ साखर’चा परवाना दहा दिवसांसाठी... बीड : अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत...
शेतीकामासाठी सालगड्यांची कमतरताअमरावती  ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन...
राज्यात ‘जलयुक्त’साठी २०८ कोटींचा निधीनगर ः दुष्काळमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या...
वीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा...नगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही...
चिंचेचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढणारसांगली : चवीने आंबट असणारी चिंच यंदा गोड झाली आहे...
परभणी, नांदेड जिल्ह्यांतील २०१७ गावांना...परभणी : २०१७-१८ च्या खरीप हंगामातील पिकांची...
जलयुक्तच्या कामांना टक्केवारीचे ग्रहणअकोला ः जलयुक्त शिवार योजनेला जसजसा अधिक कालावधी...
कृषी पर्यटनाला मिळणार जुन्नर तालुक्यात...पुणे: आैद्याेगिक विकासाला मर्यादा असल्याने...