हरभरा-तूर खरेदी प्रश्नावरून शिवसेनेचे आंदोलन

हरभरा-तूर खरेदी प्रश्नावरून शिवसेनेचे आंदोलन
हरभरा-तूर खरेदी प्रश्नावरून शिवसेनेचे आंदोलन

अकोला : जिल्ह्यात तूर खरेदी बंद असून हरभरा खरेदीसुद्धा जोमाने सुरू नाही. याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी (ता. १८) साडेचारशेपेक्षा अधिक शिवसेना कार्यकर्त्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयात अांदोलन केले. अाक्रमक शिवसैनिकांनी मार्केटिंग अधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर अाणून हरभरा, तूर वाहिली. राज्यात १५ मेपासून तूरखरेदी थांबलेली अाहे. जिल्ह्यात लाखो क्विटंल तूर शेतकऱ्यांकडे पडून अाहे. ज्यांनी विक्री केली त्यांना चुकारेही मिळालेले नाहीत. हरभरा खरेदी अत्यंत संथगतीने सुरू असून, लवकरच या खरेदीचीही मुदत संपत अाहे. या दोन्ही मुद्यांवर जाब विचारण्यासाठी शिवसेना कार्यकर्ते जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले. टेबल खुर्चीवर तूर-हरभरा फेकण्यात अाला. अधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर काढून प्रतिकात्मक तूर वाहण्यात आली. या वेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत शासकीय धोरणांचा निषेध केला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, श्रीरंग पिंजरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या वेळी आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com