राजापूरची रिफायनरीवरून मुख्यमंत्री-शिवसेनेत जुंपणार

राजापूरची रिफायनरीवरून मुख्यमंत्री-शिवसेनेत जुंपणार
राजापूरची रिफायनरीवरून मुख्यमंत्री-शिवसेनेत जुंपणार

नागपूर : राजापूर मधील रिफायनरी ही शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि केंद्रियमंत्री अनंत गीते यांच्या आग्रहामुळेच आल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर देत राजापूरची रिफायनरी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच आग्रहामुळेच आल्याचे म्हटले आहे.  शिवसेनेच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री आणि शिवसेनेत जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हा प्रकल्प कोकणात आणण्यासाठी मी कोठे मागणी केली होती त्याची लेखी माहिती तात्काळ द्यावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कोकणातील रिफायनरीसाठी केंद्रियमंत्री अनंत गीते आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आग्रह धरला होता असे विधान केले होते.त्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले असून, राजापूर येथिल रिफायनरी हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळेच होत असल्याचे या पत्रात नमुद केले आहे. मुख्यमंत्र्यांनी काल केलेले विधान हे धांदात असत्य आहे असेही राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस, माजी सदसदविवेकबुध्दी आजही शाबुत आहे. त्यानुसार हा प्रकल्प राजापूर अथवा कोकणात कोठेही यावा यासाठी कोणालाही भेटलो नाही अथवा विनंती केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय पेट्रोलियममंत्री यांना कधी भेटलो नाही अथवा अप्रत्यक्ष निवेदन देवून मागणी केली किंवा संसदेत यासंदर्भात मागणी केल्यासंदर्भात आपण तात्काळ लेखी माहिती द्यावी अशी मागणी राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली असल्याने राजापूर येथील रिफायनरीवरून शिवसेना आणि भाजपातील सामना रंगण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com