कमळ दिसत नाही, सगळीकडे मळंच दिसतोयः उद्धव ठाकरे

कमळ दिसत नाही, सगळीकडे मळंच दिसतोयः उद्धव ठाकरे
कमळ दिसत नाही, सगळीकडे मळंच दिसतोयः उद्धव ठाकरे

मुंबई: चिखलात कमळ उगवतं पण इथं कमळ तर कुठेच दिसत नाही मळ मात्र सगळीकडेच दिसत आहे. इथं उपस्थित असलेले तमाम शिवसैनिक हिच माझी शस्त्र आहेत आणि हीच माझी वडलोपार्जित मिळालेली संपती आहे, असे उद्‌गार काढून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना जिंकले आणि तुमची सोबत असेल तर कुणाशीही लढायला तयार असल्याचा इशारा दिला. शिवसेनेच्या आजच्या दसरा मेळाव्याकडे अनेकांचे लक्ष होते.

एलफिस्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेचा उल्लेख आपल्या भाषणात ठाकरे यांनी केला. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यापलीकडे काय करू शकतो, असे उद्‌गार काढून रेल्वे मंत्रालय आणि त्याच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. बुलेट ट्रेनचा उल्लेख करून त्यांनी मोदी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला.

भाजपच्या देशातल्या कारभारावर कडवड टीका करताना ते म्हणाले, "देशात सगळीकडेच कारभार बिघडलाय सगळीकडे नुसता चिखल झालाय. असं म्हणतात की चिखलात कमळ उगवतं पण इथं कमळ तर कुठेच दिसत नाही मळ मात्र सगळीकडेच दिसत आहे. पेट्रोलच्या वाढत्या दराबद्दल त्यांनी टीका करून याचे दर उतरवणयची गरज असल्याचे सांगितले.

हिंदू मत फुटू नये यासाठी आमची भाजपशी युती असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. मात्र वंदे मातरम्‌ प्रकरणावरून भाजपला त्यांनी कडक शब्द सुनावले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आम्हाला राष्ट्रपती म्हणून हवे होते याचा त्यांनी पुनरुच्चार केला. मात्र जीएसटी लागू करताना मुंबईच्या उत्पन्नाची हमी दिल्याबद्दल अर्थमंत्री अरुण जेटली यांचे त्यांनी आभार मानले. देशातला भ्रष्टाचार कमी झाला नाही तसेच काळा पैसाहीवबाहेर आला नाही नोटाबंदी पूर्ण फसली, अशी टीका त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

  • गाईला जपायचं अन् ताईला झोडायचं, हे कसलं हिंदुत्त्व?
  • देवळात घंटा बडवणारं हिंदुत्त्व मान्य नाही
  • शेंडी, जानवंवालं हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही
  • ग्रामीण भागात बिल भरलं नाही तर कारावासाची भिती दाखवली जातेय
  • गाईला मारलं तर शिक्षा जास्त, माणसाला मारलं की शिक्षा कमी, कायदा कुणासाठी आहे?
  • मोदींच्या राज्यात कुणीही सुखी नाही, त्रास देण्याशिवाय मोदी सरकारने काय दिलं?
  • नोटाबंदीसारखी हिंमत काश्मीरच्या विशेष राज्याचा दर्जा काढण्यासाठी दाखवा
  • विकासदर घसरला, 15 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या
  • काळा पैसा भ्रष्टाचार अजूनही देशात तसाच आहे
  • नोटाबंदी कशासाठी झाली, कुणासाठी झाली, काहीही माहिती नाही
  • जीएसटीवेळी सेनेने भूमिका लावून धरली नसती, तर महापालिकांचं महसूल बुडालं असतं
  • सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं कामच आम्ही करतोय
  • इकडे सत्ता, तिकडे सत्ता, पण कारभार बेपत्ता
  • या देशाची ओळख ‘हिंदुस्थान’ व्हावी म्हणून भाजपशी युती केलीय
  • जीएसटीतून समान कर लावला असेल, तर समान दरही लावा
  • मोदीजी, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवा
  • बुलेट ट्रेनच्या रुपाने आमच्या खांद्यावर मोदींचं ओझं नका टाकू
  • शिवसैनिक हे वडिलोपार्जित मिळालेली शस्त्रं
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com