हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची शिवसेनेची मागणी

हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची शिवसेनेची मागणी
हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची शिवसेनेची मागणी

बुलडाणा : शेतमालाची शासकीय हमीभावाने खरेदी करण्यासाठी तातडीने केंद्र सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेने सोमवारी (ता.२३) जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी केंद्र सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले की, कर्जमाफीमुळे शेतकरी गोंधळात आहे. नव्याने पीककर्ज मिळालेले नाही. त्यातच सोयाबीन पीक उत्पादनाबाबतीत शासकीय अनुदानाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना गेल्या वर्षभरापासून आहे. त्यातच यंदा हमीभावापेक्षा कमी दराने कापूस, सोयाबीन, उडीद, मुगाची खरेदी होत आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. शासनाने याची दखल घेऊन तातडीने हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करावेत. या वेळी जालिंदर बुधवंत, संजय गायकवाड, लखन गाडेकर, राजू मुळे अादी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com