agriculture news in Marathi, Shivsena MLA from kolhapur prakash abitkar got benefit of loan waiver scheme, Maharashtra | Agrowon

कोल्हापूरचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकरांना कर्जमाफीचे पत्र
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 डिसेंबर 2017

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सुरू असलेला घोळ थांबतच नसल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी विरोधकांना चोख प्रत्युत्तर देत घोळाला सावरण्याचा प्रयत्न केला असतानाच, शुक्रवारी खुद्द शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे पत्र मिळाल्याने पुन्हा हा घोळ चव्हाट्यावर आला आहे. 

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सुरू असलेला घोळ थांबतच नसल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी विरोधकांना चोख प्रत्युत्तर देत घोळाला सावरण्याचा प्रयत्न केला असतानाच, शुक्रवारी खुद्द शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचे पत्र मिळाल्याने पुन्हा हा घोळ चव्हाट्यावर आला आहे. 

पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नसल्याच्या कारणास्तव विधिमंडळात घमासान सुरू असतानाच, हा गंभीर प्रकार समोर आला आहे. मी अर्जही केला नसताना माझे नाव यादीत कसे आले, असा सवाल आमदार आबिटकर यांनी केला. 
दरम्यान, या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. कर्जमाफीच्या यादीत घोळ आहे ही यादी मागे घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली. 

खासदार, आमदारांसह त्यांच्या नातेवाइकांना कर्जमाफी देण्यात येत नसतानाही कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून २५ हजारांची कर्जमाफी देण्यात आल्याचे दूरध्वनीवरून कळविण्यात आले. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत अनेक शिक्षकांसह आमदार आबिटकर यांचेही नाव यादीत आल्याने त्यांनी हा प्रकार विधानसभेत आयत्या वेळच्या मुद्द्याद्वारे उपस्थित करून निदर्शनास आणून दिला. कर्जमाफी पात्र लाभार्थ्यांपर्यंत खरोखरच पोचत नसल्याचे हे ढळढळीत उदाहरण असून, एखाद्या आमदाराचे अशा यादीत नाव येणे ही गंभीर बाब असल्याचे आबिटकर यांनी सभागृहात सांगितले. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे काम हे चुकीच्या पद्धतीने चालले असल्याचे हे उदाहरण असून, असा प्रकार पात्र शेतकऱ्यावर अन्याय करणारा असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.

आमदार आबिटकर म्हणाले, की आयटी विभागाच्या शेतकरी कर्जमाफी याद्यात घोळ कायम आहे. शेतकरी सोडून शिक्षक, प्राध्यापक आदींनादेखील कर्जमाफीची पत्रे आली आहेत. तसेच प्रत्यक्ष मलादेखील कर्जमाफीचे पत्र आले असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारच्या निवेदनात मागच्या कर्जमाफीत काही लाभार्थी आमदार, शेतकरी संघाचे अध्यक्ष यांच्या नावांची यादी असल्याचे सांगितले आहे. उद्या आमचे नाव यादीत आणि वृत्तपत्रात यायच्या आधी सरकारला कळवत आहे. या संदर्भात सरकारने निवेदन करावे, अशी विनंतीही त्यांनी सभागृहाला केली.

इतर अॅग्रो विशेष
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...