agriculture news in marathi, shivsena party workers meet, shirdi, maharashtra | Agrowon

महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी यांना जाब विचारेल : उध्दव ठाकरे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी शिर्डीला आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जनतेला ‘कसं काय, बरं आहे ना,’ असे मराठीतून विचारले. मात्र ‘अजिबात बरं नाही,’ असे त्यांना ठासून सांगण्याचे धाडस करून फक्त महाराष्ट्रातील जनताच त्यांना जाब विचारेल, असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन रविवारी (ता. २१) श्री. ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी पुन्हा खासदार सदाशिव लोखंडे यांनाच मिळेल, असे त्यांनी जाहीर केले.

श्री. ठाकरे म्हणाले, की पंतप्रधान मोदी खोटी जाहिरातबाजी करून दिशाभूल करतात. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. खासदार लोखंडे शेतकऱ्यांबरोबर उपोषणास बसतात. ते कधीही व्यक्तिगत कामे घेऊन माझ्याकडे आले नाहीत. त्यांना पुन्हा दिल्लीत पाठवायचे आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील गुळमुळे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्‍वास नाही. जनतेकडून खोटे वदवून घेणारी जाहिरातबाजी करणाऱ्यांचे बुरखे फाडून वास्तव लोकांसमोर आणण्याचे काम शिवसेनेच्या गटनेत्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी करावे, असे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...