agriculture news in marathi, Shivsena will rehabilitate the families of poisoned farmers, Diwarkar Rawate | Agrowon

विषबाधितांच्या कुटुंबीयांचे शिवसेना करणार पुनर्वसन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

यवतमाळ : फवारणीदरम्यान विषबाधा झालेल्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी शिवसेना कटिबद्ध अाहे. या मोहिमेत समाजातील प्रत्येक घटकानेदेखील सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. 

यवतमाळ : फवारणीदरम्यान विषबाधा झालेल्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी शिवसेना कटिबद्ध अाहे. या मोहिमेत समाजातील प्रत्येक घटकानेदेखील सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. 

येथील उत्सव मंगल कार्यालयात रविवारी (ता.२२) फवारणीमुळे मृत्युमुखी पडलेल्या व बाधितांच्या कुटुंबीयांसाठी भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी दिवाकर रावते बोलत होते. या वेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, शिवसेना जिल्हाप्रमुख विश्‍वास नांदेकर, संतोष ढवळे, वाशिमचे जिल्हाप्रमुख राजेश पाटील, सोमेश्‍वर पुसदकर, जिल्हा परिषद सदस्य श्रीधर मोहोड, माजी आमदार बाळासाहेब मुगनगीवार, नगराध्यक्ष कांचन चौधरी, लता चंदेल अादी उपस्थित होते. फवारणीमुळे मृत्यू झालेल्या २२ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या वेळी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. शेतकऱ्यांची पत्नी, आई यांना साडीचोळी, मुला-मुलींना कपडे, दप्तर, वह्या आणि आवश्‍यक शालेय वस्तूंचे किट भेट देण्यात आले. 

 कुटुंबीयांना देणार रोजगाराचे साधन
भाऊबीज कार्यक्रमात शिवसेनेच्या वतीने विषबाधेमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांकडून एक फॉर्म भरून घेण्यात आला. त्यात त्यांना कोणत्या प्रकारची मदत हवी आहे, याविषयी विचारणा करण्यात आली. त्यात काही कुटुंबीयांनी रोजगाराकरिता पीठगिरणी, तर काहींनी दूध व्यवसायाकरिता दुधाळ जनावरांची गरज असल्याचे लिहून दिले. त्याप्रमाणे या कुटुंबीयांना लवकरच शिवसेना रोजगाराकरिता त्यांच्या इच्छेप्रमाणे मदत करणार असल्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
शेळी-मेंढीपालनासाठी विविध योजनादुष्काळी भागांमध्ये शेळी-मेंढी पालन हा एक उत्तम...
`शेतकऱ्यांची थट्टा कशाला करता?`पुणे  : डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी...
सातारा जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची... सातारा  ः जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील...
मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये ३२ टक्के... औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाणीसाठा...
तीन जिल्ह्यांत यंदा उन्हाळी पिकांचे... औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
सांगली जिल्ह्यातून १० हजार ६०० टन... सांगली ः दर्जेदार द्राक्षांच्या उत्पादनासाठी...
राज्यातील साडेसात हजारांपेक्षा अधिक...मुंबई : राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्यांना...
जलयुक्तची कामे करा; अन्यथा नोकरी सोडासांगली  ः जिल्ह्यातील पाणीटंचाई...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही कधीही...अकोला : सध्या शेतकरी, तरुण हे सर्वच त्रस्त...
राळेगणसिद्धीत गावकऱ्यांचा ‘रास्ता रोको’नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची सव्वाआठ हजार... नगर : जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या वर्षभरात...
नाशिक विभागात शेततळी योजनेच्या... नाशिक  : कृषी विभागाच्या संथ कारभारामुळे...
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...