नगर महापालिका निवडणूकीत शिवसेना ठरला सर्वांत मोठा पक्ष

नगर महापालिका निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी झालेली गर्दी
नगर महापालिका निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी झालेली गर्दी

नगर  : नगर महापालिका निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. १०) जाहीर झाला. नगर महानगरपालिका निवडणुकीत २४ जागा जिंकून शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. निवडणुकीत भाजपला अवघ्या १४ जागा मिळाल्या मात्र गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा या वेळी मात्र भाजपला जास्त जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला १८, तर काँग्रेसला ५ जागा मिळाल्या. बसपाला पहिल्यांदाच चार जागा मिळाल्या. समाजवादी पार्टीला १ जागा मिळाली. दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम अपक्ष निवडून आला आहे.

नगर महापालिकेसाठी रविवारी (ता. ९) ६७ टक्के मतदान झाले. सोमवारी भवानी नगर भागातील गोडाऊनमध्ये सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरवात झाली. ६८ जागांसाठीच्या निवडणुकीत शिवसेनेचे ६०, भाजपचे ६६, काँग्रेसचे २१, राष्ट्रवादीचे ४४, मनसेचे १४, बसपचे ९, रासपचे ३, समाजवादीचे ४, आपचे ८, भाकपचे २, भारिपचे १ व अपक्ष १०८ उमेदवार रिंगणात होते.

सोमवारी दुपारी साधारण दोन वाजता कल स्पष्ट झाला; मात्र सुरवातीला आघाडीवर असलेला भाजप मात्र नंतर पिछाडीवर गेला. अंतिम निकालात पालिकेत २४ जागा जिंकून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निवडणुकीत भाजपला अवघ्या १४ जागा मिळाल्या. मात्र गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यावेळी मात्र भाजपला जास्त जागा मिळाल्या. या निवडणुकीत खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र व नगरसेवक सुवेंद्र गांधी, सून दीप्ती गांधी यांचा मात्र पराभव झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com