agriculture news in marathi, Shivsena's Bullock cart march on Ballworm issue | Agrowon

माजलगांवात शिवसेनेचा तहसिल कार्यालयावर बैलगाडी मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 डिसेंबर 2017

माजलगांव, जि. बीड :  बोंडअळीग्रस्त शेतक-यांच्या कापसाचे पंचनामे करून शेतक-यांना तात्काळ मदत देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने तहसिल कार्यालयावर बुधवारी (ता. २०)  बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.   

माजलगांव, जि. बीड :  बोंडअळीग्रस्त शेतक-यांच्या कापसाचे पंचनामे करून शेतक-यांना तात्काळ मदत देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने तहसिल कार्यालयावर बुधवारी (ता. २०)  बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.   

तालुक्यातील कापसावर बोंडआळीचे मोठे आक्रमण झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कापसाचे नुकसान झाले असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या शेतकर्‍यांना हेक्टरी 75 हजार रूपये द्यावे, शेतीमाल खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया रद्द करा, लागवड करण्यात आलेल्या 265 जातीच्या ऊसाची पक्की नोंद घ्यावी, ऊसाला प्रतिटन 3 हजार रूपये भाव द्यावा, गाळप झालेल्या ऊसाचे 15 दिवसांत पैसे द्यावेत यांसह विविध मागण्यांसाठी तालुका शिवसेनेच्या वतीने आज सिंदफणा नदी पूल परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी चौकामार्गे तहसिल कार्यालयावर शिवसेनेचे आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात तालुक्यातील नित्रुड, पात्रुड, तेलगांव, लोणगांव, घळाटवाडी, पवारवाडी, आनंदगांवक, शुक्लतिर्थ लिमगांव, मोगरा यासह विविध गावातील शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले होते. मोर्चास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

इतर ताज्या घडामोडी
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
नाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...