agriculture news in Marathi, Shivsena's stance for approval of fodder camps | Agrowon

छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्या
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

नगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी छावण्यांना तत्काळ मंजुरी द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे गुरुवारी (ता. २१) निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. छावण्यांना मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. 

नगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी छावण्यांना तत्काळ मंजुरी द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे गुरुवारी (ता. २१) निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. छावण्यांना मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. 

माजी खासदार दादा पाटील शेळके, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले. शिवसेनेचे संदेश कार्ले, शरद झोडगे, रामदास भोर, प्रवीण कोकाटे, संदीप गुंड, दिलीप सातपुते, संभाजी कदम, राजेंद्र भगत, भाऊ ताकपिरे, दीपक कार्ले, गोविंद मोकाटे, तसेच काॅँग्रेसचे बाळासाहेब हराळ, राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे आदी या वेळी उपस्थित होते. जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. पशुधनाचा पाण्याचा, तसेच चाऱ्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जिल्ह्यात लवकरात लवकर छावण्या सुरू कराव्यात, जाचक अटी शिथिल कराव्यात, मोठ्या जनावरांसाठी शंभर, तर लहान जनावरांसाठी पन्नास रुपये दर निश्‍चित करण्यात यावेत, तत्काळ छावण्यांना मंजुरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. नगर तालुक्‍यातील अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत; परंतु सध्या एकाही छावणीला तेथे मंजुरी नाही. 

नगर तालुक्‍यात या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला असून, खरीप व रब्बीची पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत. पाण्याचे स्रोत संपले असून, शेतकऱ्यांपुढे पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. पालकमंत्री, सत्ताधारी आमदारांची शिफारस कशाला? जिल्ह्यातील पशुधनाला जगविण्याचे काम प्रशासनाने पार पाडावे. जिल्हा प्रशासन पालकमंत्री राम शिंदे, सत्ताधारी आमदार यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे.

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर काही कार्यकर्त्यांनी, सरकारी निर्णय होण्यापूर्वी पशुधन वाचविण्याच्या निर्मळ भावनेतून स्वयंस्फूर्तीने चाराछावण्या सुरू केल्या. त्यासाठी काही जणांनी मोठी जोखीम उचलली. लोकसहभागातून सुरू झालेल्या छावण्यांना मंजुरी देणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता राजकीय दबावातून डावलले जात आहे.
- संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...