agriculture news in marathi, shopping center at Manora gram soaked | Agrowon

मानोरा येथील खरेदी केंद्रावर हरभरा भिजला
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 जून 2018

वाशीम ः जिल्ह्यातील मानोरा खरेदी केंद्रावर पावसामुळे विक्रीसाठी अालेल्या हरभऱ्याची पोती अोले झाल्याचा प्रकार समोर अाला अाहे. सुमारे सातशे क्विंटल हरभरा या केंद्रावर सध्या पडून अाहे.

वाशीम ः जिल्ह्यातील मानोरा खरेदी केंद्रावर पावसामुळे विक्रीसाठी अालेल्या हरभऱ्याची पोती अोले झाल्याचा प्रकार समोर अाला अाहे. सुमारे सातशे क्विंटल हरभरा या केंद्रावर सध्या पडून अाहे.

या हंगामात मानोरा तालुक्यात गेल्या तीन दिवसांत चांगला पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. हमीभाव खरेदी केंद्रावर विक्रीसाठी अालेल्या हरभऱ्याची काही पोती अोली झाल्याचे दिसून अाले. २९ मेपासून नाफेडची हरभरा खरेदी बंद झालेली असल्याने या केंद्रावर हरभरा पडून होता. पावसापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यावर ताडपत्री टाकली. मात्र ही पोती उघड्यावर असल्याने पाण्यापासून पूर्ण बचाव झाला नाही. पोती अोली झाल्याने काही ठिकाणी कोंबसुद्धा फुटल्याचे बोलले जाते.

शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, छोट्या वाहनांतून हरभरा विक्रीसाठी अाणलेला अाहे. वाहने उभी असल्याने त्याचे भाडे दररोज वाढत अाहे. हरभरा खरेदीला मुदतवाढ मिळाली होती, परंतु बारदाना नसल्याने या केंद्रावर खरेदी झाली नाही. शेतकऱ्यांना मेेसेज पाठवलेले नसतानाही त्यांनी हरभरा विक्रीसाठी अाणला अाहे, असे खरेदी विक्री संघाने तहसीलदारांना कळविले. एकीकडे मोजमाप होत नसताना दुसरीकडे पावसापासून माल वाचवण्याची व्यवस्था या ठिकाणी नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत अाहे.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...