नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम
बातम्या
जळगाव : खानदेशात नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांतील शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, शिरपूर, चोपडा, यावल, रावेर या तालुक्यांचा मोठा भाग सातपुडा पर्वतातील प्रकल्प, नद्यांवर अवलंबून आहे. परंतु सातपुड्यातील नद्यांना पूर न आल्याने अनेक प्रकल्प अल्प प्रमाणातच भरले. काही लघू प्रकल्प कोरडेच आहेत.

यावल तालुक्यातील नागादेवी तलाव, हरिपुरा धरण, रावेरातील गारबर्डी लघू प्रकल्पांमध्ये अल्प साठा आहे. यावल तालुक्यातील मोर धरण ५४ टक्केच भरले आहे. चोपडामधील गूळ व अनेर प्रकल्प ९० टक्केही भरलेले नाहीत. शिरपूर व चोपडा तालुक्याला अनेर धरणाचा लाभ होतो. त्यातून रब्बीसाठी आवर्तन सोडले जाते. परंतु या धरणातून दोनदाच आवर्तन मिळू शकते. उन्हाळ्यात पिण्याचे पाणी व कूपनलिकांच्या पुनर्भरणासाठी पाणी मिळणे कठीण होईल.
शहादा तालुक्यात सातपुड्यातून येणाऱ्या सुसरी नदीवरील म्हसावद- ब्राह्मणपुरीनजीकच्या रस्त्यावरील लघू प्रकल्प जवळपास भरला आहे. परंतु त्यातून पुढे पाणी सोडलेले नाही. कारण, प्रकल्पात मागील महिनाभरापासून जोरदार प्रवाहच नाही.
रावेरातील अभोरा, मंगरूळ व सुकी हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्याचा थोडा दिलासा मिळणार असला तरी नद्यांना पूर न आल्याने सातपुड्याच्या पायथ्यालगतच्या गावांमधील कूपनलिका, विहिरींच्या पाण्याची पातळी कमी होईल. पुढे नदीमध्ये धरणांमधून पाणी सोडावे लागेल. यावल तालुक्यात जोरदार पाऊस झालाच नाही. दुष्काळी स्थिती आहे.
- 1 of 565
- ››