agriculture news in Marathi, shortage of analyst in pesticide laboratories, Maharashtra | Agrowon

कीटकनाशक प्रयोगशाळांमध्ये विश्लेषकांची कमतरता
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 डिसेंबर 2017

पुणे : कीटकनाशकांची विक्री वाढत असताना राज्यातील प्रयोगशाळांमध्ये विश्लेषकांची कमतरता भासत आहे. यवतमाळच्या कीटकनाशक विषबाधा प्रकरणानंतर प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्याची गरज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पुणे : कीटकनाशकांची विक्री वाढत असताना राज्यातील प्रयोगशाळांमध्ये विश्लेषकांची कमतरता भासत आहे. यवतमाळच्या कीटकनाशक विषबाधा प्रकरणानंतर प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्याची गरज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कृषी विभागाच्या अखत्यारित औरंगाबाद, ठाणे, अमरावती, पुणे अशा चार ठिकाणी कीटकनाशके तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात आलेल्या आहेत. कृषी खात्याने या प्रयोगशाळांचा तांत्रिक दर्जा  चांगला सांभळला आहे. त्यामुळेच या प्रयोगशाळांना राष्ट्रीय परीक्षण व तपासणी प्रयोगशाळा अधिस्विकृती मंडळ अर्थात ‘एनएबीएल’ची मान्यता मिळाली. कीटकनाशक उत्पादक कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी याच प्रयोगशाळांचे अहवाल वापरले जातात.

‘‘प्रयोगशाळांचा दर्जा चांगला असला तरी मनुष्यबळ पुरेसे नाही. त्यामुळे एका प्रयोगशाळेत वर्षभरात २५०० ते ३००० नमुन्यांची तपासणी करताना दमछाक होते. या प्रयोगशाळांना रसायन शास्त्रज्ञ म्हणून तालुका कृषी अधिकारी दर्जाचा अधिकारी देण्यात आलेला आहे. त्याच्या मदतीला कृषी अधिकारी दर्जाचे विश्लेषक देण्यात आलेले आहेत. मात्र, विश्लेषकांची टंचाई असल्यामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागतो,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

‘‘प्रयोगशाळांना पूर्वी ८ विश्लेषक होते. पदसंख्या वाढविण्याऐवजी पदांमध्ये कपात करून फक्त सहा विश्लेषक ठेवण्यात आले. त्यापैकी काही पदे रिक्त असतात. भविष्यात प्रयोगशाळांना केवळ तीन विश्लेषक देण्याचा नवा पॅटर्न येण्याची शक्यता आहे. मुळात प्रत्येक जिल्ह्यात एक प्रयोगशाळा देण्याची गरज आहे. जिल्हा प्रयोगशाळेची बाब खर्चिक वाटत असल्यास किमान प्रत्येक विभागासाठी योग्य मनुष्यबळासहित  एक प्रयोगशाळा उभारण्याची गरज आहे, असे अधिकारी वर्गाचे म्हणणे आहे. 

अप्रमाणित नमुन्याचे तात्काळ ‘अलर्ट’ जातात
राज्यात शेतकऱ्यांना विकल्या जाणाऱ्या कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ किंवा मूळ घटकांचे प्रमाण कमी निघण्याचे प्रकार होत असतात. प्रयोगशाळेत नमुना अप्रमाणित निघाल्यास ४८ तासांत माहितीचा ‘अलर्ट’ अधिकाऱ्यांना जातो. मात्र, त्यानुसार या अप्रमाणित कीटकनाशकाविषयी शेतकऱ्याला माहिती कळविली जाते की नाही, याबाबत आम्हाला काहीही सांगता येणार नाही, असे प्रयोगशाळांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...