agriculture news in Marathi, shortage of Eggplant in state, Maharashtra | Agrowon

रेशीम अंडीपुंजांचा तुटवडा
संतोष मुंढे
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

महिनाभरापूर्वी दीडशे अंडीपूंजाची मागणी नोंदविली. परंतु अद्याप पुरवठा झाला नाही. तीन एकरातील तुतीचा पाला तयार आहे. पाणीटंचाईमुळे तो जगविण्याचा प्रश्न आहे. दुसरीकडे आजवर चॉकी मिळाली असती तर किमान एक बॅच निघून गेली असती.
- शहादेव ढाकणे, रेशीम उत्पादक, देवगाव, जि. औरंगाबाद.

औरंगाबाद : झपाट्याने विस्तारत असलेल्या रेशीम उद्योगाला अंडीपुंज उपलब्धतेचा तुटवडा जाणवत आहे. याचा थेट परिणाम राज्याच्या रेशीम कोष उत्पादनावर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्याने अंडीपुंज निर्मितीत स्वयंपूर्ण होण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. अंडीपुंज पुरवठ्याचा विषय केंद्र सरकारच्या अधिनस्त यंत्रणेकडे असल्याने त्यावर कधी निर्णय होतो, याकडे रेशीम उत्पादकांचे लक्ष लागले आहे. 

 पान १ वरून
महाराष्ट्रात रेशीमचा विस्तार झपाट्याने होत आहे. खासकरून मराठवाड्याने राज्याच्या रेशीम कोष उत्पादनात निम्मा वाटा उचलला आहे. सततच्या दुष्काळामुळे एकीकडे सर्वच शेती नुकसानीची ठरत असताना रेशीम मात्र शेतकऱ्यांना शाश्वत आधार देत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावरून रेशीम विस्तारासाठी चॉकी सेंटर निर्मिती, अंडीपूंज निर्मिती केंद्रासाठी पावले उचलली जात असताना अंडीपूंजाच्या तुटवड्याने महाराष्ट्रातील रेशीम कोष उत्पादनाला ब्रेक लावला आहे. 
प्राप्त माहितीनुसार राज्यातील नोंदणीकृत तुती लागवडीच्या क्षेत्राचा अंदाज घेऊन मे मध्ये राज्याकडून केंद्राकडे जवळपास पाच लाखावर अंडीपुंजाचा पुरवठा करावा लागेल याविषयी मागणी केली होती. त्यानंतर अलीकडे ऑक्‍टोबरच्या मध्यान्हात पुन्हा जवळपास सव्वाचार लाख अंडीपूंजाची मागणी करण्यात आली. त्याचवेळी आधीची मागणी केलेले अंडीपूंज मिळाले नसल्याची आठवणही केंद्रीय स्तरावर करून देण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत याविषयी चिंतन होऊन लवकरच अंडीपूंज पुरवठा करण्याविषयी पावले उचलले जातील असे कळविण्यात आले होते. परंतु अद्यापही अंडीपूंज मिळण्याचा मार्ग सुकर न झाल्याने कोष उत्पादनासाठी अंडीपूंजाच्या अनुप्लब्धतेने अडथळा निर्माण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अर्थात त्याचा थेट परिणाम राज्यातील रेशीम कोष उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

असे व्हायला हवेत प्रयत्न

  • अंडीपूंज निर्मिती केंद्राच्या उभारणीला गती देणे
  • खासगी अंडीपूंज निर्मितीला प्रोत्साहन देणे.
  • मिळेल तिथून खात्रीशीर दर्जेदार अंडीपूंज उपलब्ध करणे.
  • आता निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेऊन पुढील सर्व वर्षाचे नियोजन करणे.

प्रतिक्रिया
चॉकी सेंटरच्या माध्यमातून सप्टेंबर व ऑक्‍टोबरमध्ये जवळपास साडेसात हजार अंडीपूंजाची मागणी नोंदविण्यात आली होती, परंतु अजून पुरवठा झाला नाही. त्यासंदर्भात आमच्या स्तरावरून रेशीम विभागाकडे मागणीनुसार उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू आहे.
- मंगल संतोष वाघमारे, चॉकी केंद्रचालक, केकतजळगाव.

अंडीपूंजाची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तांत्रिक अडचणीमुळे अंडीपूजाची कमतरता आली. त्यासाठी केंद्राशी सतत संपर्कात आहोत. याशिवाय खासगी अंडीपूंज निर्मितीला प्रोत्साहन, कर्नाटकातून दर्जेदार अंडीपूंज लवकरात लवकर उपलब्ध कसे होतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- दिलीप हाके, सहायक संचालक, रेशीम, मराठवाडा, औरंगाबाद.

इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल;...पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे...
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...