agriculture news in marathi, Shorty response to group schemes in Dhule, Jalgaon district | Agrowon

धुळे, जळगाव जिल्ह्यात गटशेती योजनेला अल्प प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

मागील वर्षी शेतकरी गटाची नोंदणी या योजनेसाठी केली; पण कामच सुरू झालेले नाही. आता नवीन नोंदणीचा लक्ष्यांक आला आहे.
- प्रकाश पाटील, शेतकरी, पढावद (जि. धुळे)

जळगाव : गटशेतीला प्रोत्साहन देण्यासंबंधीच्या गटशेती योजनेला खानदेशातील धुळे व जळगावात यंदा प्रतिसादच मिळालेला नाही. मागील वर्षी गट नोंदणीचा लक्ष्यांक दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूर्ण झाला. यंदा मात्र नोंदणीच केलेली नसल्याचे चित्र आहे.

२०१७-१८ मध्ये धुळे जिल्ह्यात पाच गटांची गटनोंदणी झाली. जळगावात सहा गटांची नोंदणी पूर्ण झाली. यंदाही धुळ्यात पाच व जळगाव जिल्ह्यात सहा गटांची नोंदणी करण्याचा लक्ष्यांक आहे. परंतु तो अजूनही पूर्ण झालेला नाही. शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद नाही. या योजनेतील काही अटी जाचक आहेत. त्यातच यंदा दुग्ध उत्पादनासंबंधीचा प्रकल्प, आराखडा या योजनेत घेता येणार नाही. कारण दूध धंदा अडचणीत आहे. त्याबाबतचा शासनादेशच जारी झाला आहे. म्हणून दूध उत्पादनाबाबत ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव होते, ते माघारी गेले आहेत.

मागील वर्षी धुळ्यात पाच गटांची नोंदणी झाली, परंतु कार्यवाही कोणतीच नाही. यंदा नव्या गटांच्या नोंदणीसह योजनेच्या अंमलबजावणीसंबंधी येत्या १५ तारखेला धुळे जिल्हाधिकारी यांनी बैठक बोलावली आहे.  या योजनेत सहभागासाठी २० शेतकरी आवश्‍यक आहेत. त्यांच्याकडे १०० एकर क्षेत्र असावे. सर्व २० शेतकरी एकाच गावातील हवेत. त्यांची शेती त्यांच्या गावात किंवा गावानजीकच्या इतर ठिकाणी असावी, असा निकष आहे. नेमके एकाच गावात २० शेतकरी गोळा करणे व १०० एकर शेतीचे उद्दीष्ट साध्य करताना अडचणी येत आहेत. योजनेतून एक कोटीपर्यंतचे अनुदान मिळते. ते चार टप्प्यात दिले जाते. सुरवातीला २० टक्के, नंतर दोन टप्प्यांत प्रत्येकी ३० टक्के व शेवटी सर्व बाबींची मूल्यमापन, पडताळणी, कार्यवाही पाहून २० टक्के अनुदान दिले जाते.

उपसा सिंचन योजनेला मंजुरी

या योजनेसंबंधी उपसा सिंचन योजना घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ४२ लाखांपर्यंतचा खर्च त्यातून करता येईल. तलाव, धरण क्षेत्र, नदीवरून जलवाहिनी आणता येणार आहे. या योजनेसाठी आवश्‍यक वीजपुरवठ्याची यंत्रणाही उभारता येणार आहे.

इतर बातम्या
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...