agriculture news in marathi, should also have 'MSP' sugar: Diliprao Deshmukh | Agrowon

‘एमएसपी’ साखरेलाही पाहिजे ः दिलीपराव देशमुख
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

लातूर ः उसाला, दुधाला, शेतमालाला हमी भाव मिळावा म्हणून आंदोलन केली जात आहेत. ऊस जर शेतकऱ्याचे पीक असेल तर साखरदेखील त्यांचेच उत्पादन समजले पाहिजे. त्यातून साखरेलादेखील एमएसपी लागू केली गेली तरच शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर देता येईल, असे मत माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांनी येथे व्यक्त केले.

लातूर ः उसाला, दुधाला, शेतमालाला हमी भाव मिळावा म्हणून आंदोलन केली जात आहेत. ऊस जर शेतकऱ्याचे पीक असेल तर साखरदेखील त्यांचेच उत्पादन समजले पाहिजे. त्यातून साखरेलादेखील एमएसपी लागू केली गेली तरच शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर देता येईल, असे मत माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांनी येथे व्यक्त केले.

लातूर जिल्ह्यात मांजरा साखर परिवाराच्या वतीने उसाला उच्चांकी दर देण्यात आला आहे. त्यामुळे विविध संघटनांच्या वतीने मंगळवारी (ता. १८) त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजक शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते सत्तार पटेल, शेतकरी संघटनेचे राजेंद्र मोरे, रयत शेतकरी संघटनेचे पेठे हे होते. अध्यक्षस्थानी देवणीचे मल्लिकार्जून मानकरी हे होते. उसाला उच्चांकी भाव दिल्याबद्दल पहिल्यांदाच असा प्रकारचा सत्कार येथे झाला.

राज्यात कृषी विभागाला स्वतंत्र मंत्री नाही हे दुर्दैव आहे. सरकारला गायीची काळजी आहे. पण गायी सांभाळणाऱ्या शेतकऱ्याला मात्र वाऱ्यावर सोडले जात आहे, अशी टीका श्री. देशमुख यांनी या वेळी केली.

लातूर जिल्ह्यात कारखाने बुडवणारे नेते झाले आहेत. पण राज्याने आदर्श घ्यावा, अशी कारखानदारी मांजरा परिवाराची आहे. हे केवळ श्री. देशमुख यांच्यामुळे घडले आहे, असे श्री. साळुंके म्हणाले. या वेळी श्री. नागरगोजे, श्री. मानकरी, श्री. मोरे, श्री. पटेल यांची भाषणे झाली. या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

इतर बातम्या
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
यंदा पाऊस, पीकपाणी समाधानकारक :...सोलापूर  ः यंदा पावसाचे प्रमाण पुरेसे राहील...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...