agriculture news in marathi, Shravan's finish to market, pitch base | Agrowon

श्रावण सरताच उंचावला बाजार, खपवाढीने आधार
दीपक चव्हाण
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

महाराष्ट्रात श्रावण संपल्यानंतर ब्रॉयलर्सच्या बाजारभावात जोरदार सुधारणा दिसली आहे. गणपती उत्सव काळात संतुलित पुरवठा होत असल्यामुळेही बाजाराचा कल वरच्या दिशेकडे आहे. अंड्याचा खप आणि दरामध्येही जोरदार सुधारणा झाली आहे.

नाशिक विभागात शनिवारी (ता. १५) रोजी ६३ रु. प्रतिकिलो दराने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत दरामध्ये प्रतिकिलो ९ रु. सुधारणा झाली आहे. दुसरीकडे टेबल एग्जच्या खपात चांगली सुधारणा असून, पुणे विभागात प्रतिशेकडा २५ रु. ने बाजार उंचावला.

महाराष्ट्रात श्रावण संपल्यानंतर ब्रॉयलर्सच्या बाजारभावात जोरदार सुधारणा दिसली आहे. गणपती उत्सव काळात संतुलित पुरवठा होत असल्यामुळेही बाजाराचा कल वरच्या दिशेकडे आहे. अंड्याचा खप आणि दरामध्येही जोरदार सुधारणा झाली आहे.

नाशिक विभागात शनिवारी (ता. १५) रोजी ६३ रु. प्रतिकिलो दराने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत दरामध्ये प्रतिकिलो ९ रु. सुधारणा झाली आहे. दुसरीकडे टेबल एग्जच्या खपात चांगली सुधारणा असून, पुणे विभागात प्रतिशेकडा २५ रु. ने बाजार उंचावला.

ब्रॉयलर्स बाजारभावाबाबत नाशिक येथील व्हिनस पोल्ट्रीचे संचालक डॉ. अनिल फडके म्हणाले, की शनिवारच्या तुलनेत रविवार लिफ्टिंगचा बाजारभाव आणखी तीन ते चार रुपयांनी उंचावण्याची अपेक्षा आहे. मोठ्या वजनाच्या पक्ष्यांसाठी चांगली मागणी आहे. गणेश उत्सवातील घटती मागणी लक्षात घेत पोल्ट्री उद्योगाने मागणी-पुरवठ्याचे योग्य संतुलन साधल्याचा सकारात्मक परिणाम सध्याच्या बाजारभावावर दिसत आहे. चालू आठवड्यात गणेश उत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवसांनंतर चिकनच्या खपात वाढ होईल. एकूणच येत्या दोन आठवड्यांत परिस्थिती चांगली राहील. वाढते तापमान आणि आर्द्रतेमुळे उत्पादनवाढ नियंत्रणात राहील. त्यामुळे पुढेही बाजार सुधारण्यासाठी वाव आहे.

कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की काही आठवड्यांच्या नरमाईच्या पार्श्वभूमीवर, श्रावण संपल्यानंतर बाजारभाव उंचावले आहेत. संतुलित पुरवठ्याच्या नियोजनानेही चांगला परिणाम साधला. किरकोळ मागणीत चांगली सुधारणा झाल्यामुळे आठवडाभरात बाजारभाव जवळपास दहा रु. वाढला. दक्षिणेतील हैदराबाद आणि बंगळुरू मार्केट हे महाराष्ट्राच्या समकक्ष ६३ ते ६४ रु. प्रतिकिलो दरम्यान आहे. सध्या पक्ष्यांची उपलब्धता कमी असल्याने सध्याचा वरच्या दिशेचा कल यापुढेही नियमित राहण्याची चिन्हे आहेत. तथापि, सध्याचे चिक्स दर पाहता ओपन फार्मर्सनी सावधगिरीने प्लेसमेंटचे नियोजन केले पाहिजे.

नाशिक येथील ज्युपिटर अॅग्रोचे संचालक डॉ. सीताराम शिंदे म्हणाले, की चालू आठवड्यात ब्रॉयलर्सचे दर ७० रु. पर्यंत वधारण्याची अपेक्षा आहे. जादा वजनाचे पक्षी बाजारात उपलब्ध नाहीत. गुजरात राज्यातील बाजारभावही आधार देणारा आहे. अडीच किलोच्या आत पक्ष्यांची वजने राखल्यास ७० रु. दर दीर्घकाळपर्यंत स्थिरावू शकतो.

मागील आठवडाभरात एका दिवसाच्या पिल्लांच्या बाजारभावात प्रतिनग दोन रु. ने वाढ झाली आहे. हॅचिंग एग्जचे दरही एक रु. वधारले आहेत. दसरा आणि पुढील उत्सवी सणांच्या पार्श्वभूमीवर, इंटिग्रेटर्स आणि ओपन फार्मर्सकडून मोठ्याप्रमाणावर प्लेसमेंट वाढवण्यात आली आहे. यामुळे संबंधित कालावधी मागणी-पुरवठ्याचे गणित बिघडू शकते. ओपन फार्मर्सनी वरील बाब लक्षात घेऊन नियोजन केले पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

ब्रॉयलर्स बाजाराचा कल वरच्या दिशेने राहण्याची चिन्हे आहेत. तथापि, सध्याचे चिक्स दर पाहता ओपन फार्मर्सनी सावधगिरीने प्लेसमेंटचे नियोजन केले पाहिजे.
- कृष्णचरण, संचालक, कोमरला

प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ६३ प्रतिकिलो नाशिक
चिक्स ३१ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज २२ प्रतिनग मुंबई
अंडी ३७० प्रतिशेकडा पुणे

 

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...