agriculture news in Marathi, Shri kshetra khanderaya yatra started, Maharashtra | Agrowon

श्री क्षेत्र माळेगाव खंडेरायाच्या यात्रेस प्रारंभ
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 डिसेंबर 2017

माळकोळी, जि. नांदेड ः बेल-फूल भंडाऱ्याची उधळण... आणि येळकोट... येळकोट जय मल्हारचा गजर. भंडाऱ्यात रंगलेले, खंडरायाच्या भक्तीत दंगलेले भाविक... अशा भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडेरायाच्या यात्रेला शनिवारी (ता. १६) प्रारंभ झाला. दक्षिण भारतातील सर्वांत मोठी आणि अनेक समाज घटाकांसाठी जिव्हाळ्याची म्हणून माळेगावच्या यात्रेस प्रसिद्धी आहे. हजारो भक्तांच्या साक्षीने श्री खंडोबाच्या देवस्वारीने यात्रेची सुरवात झाली.

माळकोळी, जि. नांदेड ः बेल-फूल भंडाऱ्याची उधळण... आणि येळकोट... येळकोट जय मल्हारचा गजर. भंडाऱ्यात रंगलेले, खंडरायाच्या भक्तीत दंगलेले भाविक... अशा भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र माळेगाव येथील श्री खंडेरायाच्या यात्रेला शनिवारी (ता. १६) प्रारंभ झाला. दक्षिण भारतातील सर्वांत मोठी आणि अनेक समाज घटाकांसाठी जिव्हाळ्याची म्हणून माळेगावच्या यात्रेस प्रसिद्धी आहे. हजारो भक्तांच्या साक्षीने श्री खंडोबाच्या देवस्वारीने यात्रेची सुरवात झाली.

 श्री खंडोबा देवस्थानातून परंपरेनुसार देवांची पालखी काढण्यात आली. पालखीच्या पुढे परंपरेनुसार रिसनगावचे मानकरी गणपतराव मल्हारराव नाईक यांची पालखी होती. वाजत-गाजत आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालख्या मार्गस्थ झाल्या. त्याबरोबर बेल-फूल भंडार, खोबऱ्यांची उधळण सुरू झाली.

भंडाऱ्याच्या उधळणीने आणि तोंडी खंडोबारायाच्या जयघोषणाने वातावरण भक्तिमय होऊन गेले. देवस्वारी आणि पालखीची नगर प्रदक्षिणा मुख्य रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहासमोर आली. या वेळी नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने मानकऱ्यांचा स्वागत-सत्कार करण्यात आला. देवाच्या पालखीचे पूजन करण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम सभापती समाधान जाधव, शिक्षण व आरोग्य समिती सभापती माधवराव मिसाळे, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी, महिला व बालकल्याण सभापती सौ. मधुमती देशमुख, समाज कल्याण सभापती शीलाताई निखाते, लोहा पंचायत समिती सभापती सतीश पाटील उमरेकर, माजी आमदार माधवराव पाटील, हरिहरराव भोसीकर, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, माळेगावचे सरपंच गोविंद राठोड, उपसरपंच सुंदरबाई धुळगंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात...
आव्हान पाणी मुरविण्याचेठिबक सिंचन अनुदानासाठी यावर्षी विक्रमी निधी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...