agriculture news in marathi, Shrinking the market in the fall market | Agrowon

गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

नाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो बाजारात व्यापाऱ्यांकडून परस्पर कुणीही पैशांची वसुली करू नये, असा ठराव बुधवारी (ता. १०) झालेल्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. रामचंद्र देवस्थान ट्रस्टने या वसुलीबाबत दिलेल्या लिलावास ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करण्यात आला. याबाबत सर्वसंमतीने ठराव संमत झाला. या निर्णयामुळे लाखो रुपयांच्या बेहिशेबी वसुलीला चाप बसणार आहे.

नाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो बाजारात व्यापाऱ्यांकडून परस्पर कुणीही पैशांची वसुली करू नये, असा ठराव बुधवारी (ता. १०) झालेल्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. रामचंद्र देवस्थान ट्रस्टने या वसुलीबाबत दिलेल्या लिलावास ग्रामस्थांकडून कडाडून विरोध करण्यात आला. याबाबत सर्वसंमतीने ठराव संमत झाला. या निर्णयामुळे लाखो रुपयांच्या बेहिशेबी वसुलीला चाप बसणार आहे.

गिरणारे परिसरातील हा बाजार पिंपळगाव बसवंत नंतर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बाजार आहे. हंगामात या बाजारात सरासरी १ लाख क्रेटची टोमॅटाची आवक होते. अनेक व्यक्ती व संस्था व्यापाऱ्यांकडून परस्पर पैशाची वसुली करतात. यामुळे टोमॅटोच्या बाजारावर विपरीत परिणाम होतो. गिरणारे टोमॅटो मार्केटच्या हंगामाचा नुकताच प्रारंभ झाला असून या पार्श्‍वभूमीवर गिरणारेची ग्रामसभा बोलावण्यात आली होती. या वेळी ग्रामपंचायती व्यतिरिक्त अन्य कुणीही बाजार वसुली करू नये, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

रामचंद्र देवस्थान ट्रस्टच्या संचालकांनी विश्‍वासात न घेता परस्पर बाजाराचा लिलाव जाहीर केला आहे. तो बेकायदेशीर असून त्याबाबत दाद मागण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. या वेळी ग्रामस्थांमधूनही त्यास विरोध करण्यात आला. या वेळी नाशिक तालुका शेतकी संघाचे माजी अध्यक्ष निवृत्ती घुले, संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टचे विश्‍वस्त पुंडलिकराव थेटे, भिकाभाऊ थेटे, सखाराम थेटे, नितिन गायकर, महेंद्र थेटे, प्रवीण कोरडे, हिरामण गायकर, विजुनाना थेटे, हरिभाऊ गायकर, रोहन थेटे, विलास थेटे उपस्थित होते.

बाजारासाठी सुविधा पुरविणार

गिरणारे टोमॅटो बाजारात शेतकरी व व्यापाऱ्यांना रस्ते, वीज, पाणी या सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून नियोजन करण्यात येणार आहे. हंगामातील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी येण्या-जाण्याचे मार्ग निश्‍चित करण्यात येणार आहेत. बाजारातील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्तही मागविण्यात आला अाहे, असे सरपंच अलका दिवे व उपसरपंच तानाजी गायकर यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...