agriculture news in marathi, Shutdown of merchants in Akola market committee | Agrowon

अकोला बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद
टीम अॅग्रोवन
रविवार, 2 सप्टेंबर 2018

व्यापाऱ्यांनी दिले लेखी पत्र    
येऊ घातलेल्या सुधारणांचा निषेध म्हणून या बाजार समितीतील व्यापारी, अडत्यांनी बंदबाबत लेखी पत्र दिले अाहे. शनिवारपासून खरेदी-विक्री बंद अाहे. लेखी खुलासा येईपर्यंत शेतीमालाची खरेदी-विक्री करणार नसल्याचे त्यांनी कळविले अाहे.
- सुनील मालोकार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला

अकोला : अाजवर व्यवहार सुरू असलेल्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीतही व्यापारी-अडत्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्याविरुद्ध कैद व दंडाची शिक्षा करणाऱ्या सुधारणेस विरोध करीत शनिवारपासून (ता. १) व्यवहार बंद केले अाहेत. अाता वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांतील बहुतांश बाजार समित्या बंदमध्ये सहभागी झाल्या अाहेत.

सरकारच्या निर्णयाविरुद्ध ठिकठिकाणी व्यापाऱ्यांनी खरेदी-विक्री करण्यास नकार देत बाजार समित्या बंद केल्या. या भागात काही बाजार समित्या २३ अाॅगस्टपासून बंद अाहेत. अाता टप्प्याटप्प्याने सर्वच बाजार समित्यांमधील व्यवहार यामुळे ठप्प झाले अाहेत. अाजवर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यवहार सुरू होते. परंतु अाता याही ठिकाणी व्यापाऱ्यांनी नकार देत जोपर्यंत लेखी सूचना मिळत नाही, तोपर्यंत व्यवहार न करण्याचे सांगितले.वऱ्हाडात अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात अातापर्यंत १७ पेक्षा अधिक बाजार समित्यांमध्ये बंद सुरू अाहे. यात अाता अकोल्याचाही सहभाग झाला. या भागात मूगाचा हंगाम सुरू झाला अाहे. येत्या अाठवड्यापासून हा शेतीमाल मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीला येण्याची शक्यता असताना बाजार समित्यांमध्ये खरेदी-विक्री ठप्प झालेली अाहे. याचा थेट परिणाम बाजारभावांवर होण्याची चिन्हे अाहेत.

बंद बाजार समित्या (जिल्हानिहाय)

अकोला : अकोला, अकोट, तेल्हारा

बुलडाणा : बुलाडणा, मलकापूर, जळगावजामोद, संग्रामपूर, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा, खामगाव
 वाशीम : वाशीम, मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, कारंजा.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...