'सिद्धेश्‍वर'कडून उशिराच्या उसाला जादा दर

'सिद्धेश्‍वर'कडून उशिराच्या उसाला जादा दर
'सिद्धेश्‍वर'कडून उशिराच्या उसाला जादा दर

सोलापूर : कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात १५ फेब्रुवारीनंतर गाळपास येणाऱ्या सभासदांच्या उसाला जादा दर देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली.  १६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन ५० रुपये, १ ते १५ मार्चपर्यंत प्रतिटन १०० रुपये, १६ ते ३१ मार्चपर्यंत येणाऱ्या उसाला १५० रुपये, तर १ एप्रिल ते हंगाम बंद होईपर्यंतच्या उसाला प्रतिटन २०० रुपये जादा दर देण्यात येणार आहे. उसाचे एकरी उत्पादन सुमारे आठ ते १० मेट्रिक टनाने नैसर्गिकरीत्या वाढल्याने ऊसतोडणी कार्यक्रम लांबत आहे. याही वर्षी नुकसानभरपाई  म्हणून जादा दर देण्याचे धोरण संचालक मंडळाने जाहीर केले आहे. चालू गळीत हंगामाची एफआरपी तोडणी, वाहतूक खर्च वजा जाता प्रतिमेट्रिक टन दोन हजार ७० इतकी आहे. मात्र कारखान्याने नोव्हेंबरमध्ये दोन हजार २०० रुपये प्रतिमेट्रिक टन दर जाहीर केला होता. त्या वेळी बाजारातील साखरेचे असणारे चांगले दर व सभासद शेतकऱ्यांची एफआरपीपेक्षा जादा उचल मिळण्याची असलेली भावना विचारात घेऊन एफआरपी दोन हजार ७० व वाढीव १३० रुपये प्रतिमेट्रिक टन असे दोन हजार २०० रुपये पहिली उचल जाहीर ६केली होती. त्यानुसार १५ डिसेंबर २०१७ अखेर गाळपास आलेल्या उसाचे पेमेंटही अदा केले असल्याचेही काडादी यांनी सांगितले. 

डिसेंबरनंतरच्या उसाला दोन हजार रुपये  कमी झालेल्या साखरेच्या दरामुळे कारखान्यास पतपुरवठा करणाऱ्या बॅंकेने साखरेचे मूल्यांकन दर प्रतिक्विंटल तीन हजार ५० रुपये केले आहे. १५ टक्के मार्जिन वजा जाता दोन हजार ५९२ रुपये प्रतिटन उपलब्ध होत आहेत. प्रक्रिया खर्च वजा जाता ऊस पेमेंट करण्याकरिता बॅंकेकडून प्रतिमेट्रिक टन एक हजार ४४२ रुपये उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ७५७ रुपयांच्या फरकाची रक्कम कारखान्यास स्वनिधीतून तूर्त देणे शक्‍य होत नाही. गाळप हंगाम संपेपर्यंत सर्व ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना वेळेत उसाचे पेमेंट होण्यासाठी १६ डिसेंबरपासून गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिमेट्रिक टन दोन हजार रुपयांप्रमाणे ऊस पेमेंट अदा केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com