agriculture news in marathi, 'Siddheshwar', 'Bhima' suspension from co-operatives in action | Agrowon

‘सिद्धेश्‍वर’, ‘भीमा’च्या कारवाईला सहकारमंत्र्यांकडून स्थगिती
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 ऑगस्ट 2018
सोलापूर : शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर न दिल्याने सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखाना व भीमा सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा आदेश साखर आयुक्त व त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. या आदेशाला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्थगिती दिली आहे. एफआरपी देण्याएवढी दोन्ही कारखान्यांची आर्थिक क्षमता असल्याने त्यांच्यावरील कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीवरील सुनावणी ५ सप्टेंबरला होणार आहे.
सोलापूर : शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर न दिल्याने सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखाना व भीमा सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा आदेश साखर आयुक्त व त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. या आदेशाला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्थगिती दिली आहे. एफआरपी देण्याएवढी दोन्ही कारखान्यांची आर्थिक क्षमता असल्याने त्यांच्यावरील कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीवरील सुनावणी ५ सप्टेंबरला होणार आहे.
साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाला एफआरपीप्रमाणे दर न दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी संघटना, शिवसेना आक्रमक झाली आहे. साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला सहकारमंत्री देशमुख यांनी स्थगिती दिल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा मोबदला वेळेत मिळणार का? याबद्दल आता प्रश्‍न उपस्थित होत आहेत.
कारखान्याने एफआरपीपेक्षा १३० रुपये दर अधिक जाहीर केला आहे. कारखान्याकडे साडेसात लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे असून त्याची बाजारमूल्यानुसार किंमत २४० कोटी आहे. कारखान्याने महावितरणला विकलेल्या विजेचे १९ कोटी रुपये येणेबाकी आहे. अन्य उत्पादनांचाही साठा उपलब्ध आहे. कारखान्याने पूर्व हंगामी कर्जासाठी बॅंकेकडे ४५ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली आहे. आजपर्यंत कधीही ऊस बिले थकविली नाहीत. शेतकऱ्यांची बिले देण्याची क्षमता कारखान्याकडे आहे. त्यावरील कारवाईचा आदेश रद्द करावा, अशी मागणी अपिलाद्वारे कारखान्याच्या वतीने देशमुख यांच्याकडे करण्यात आली होती.
भीमा कारखान्याने गाळप क्षमता वाढविली परंतु तांत्रिक कारणास्तव पूर्ण क्षमतेने गाळप होऊ शकले नाही. मार्च २०१८ पासून कारखाना उत्पादित साखर विकू शकला नाही. साखरेच्या किमतीत घसरण झाल्याने निधी उभा करण्यास अडचणी येत आहेत. १५ फेब्रुवारी २०१८ पर्यंत गाळप झालेल्या उसाची एफआरपी दिली आहे. त्यानंतर गाळप केलेल्या म्हणजे फक्त एक महिन्याची एफआरपी देणे बाकी आहे. कारखान्याच्या मालमत्ता लिलावाचा आदेश रद्द न केल्यास कारखान्याचे न भरून येणारे नुकसान होईल, अशी बाजू कारखान्याने मांडली आहे.
आणखी कारखान्यांची भर एफआरपी न दिल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये अक्कलकोट तालुक्‍यातील मातोश्री लक्ष्मी शुगर, करमाळा तालुक्‍यातील मकाई सहकारी साखर कारखाना व माढा तालुक्‍यातील विठ्ठल रिफाइंड शुगर यांचा समावेश आहे. 

इतर बातम्या
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
परभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या...
करवीर तालुक्‍यात लघुपाटबंधारे विभागात...कोल्हापूर : करवीर तालुक्‍यातील लघू...
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
महामार्ग सुरू होण्यापूर्वीच वाळूमाफिया...जळगाव ः जळगाव शहरातील वाढते अपघात आणि...
शेतकऱ्यांनी जाणले कृषी तंत्रज्ञानभंडारा : परंपरागत कृषी विकास योजनेतून तालुका कृषी...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
गाळपेर क्षेत्रातून मिळणार ४८ हजार टन... नाशिक : दुष्काळात जिल्ह्यात चाराटंचाई...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...
उजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर  : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...
अवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...
बाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...
समृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...
विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...