agriculture news in marathi, Siddheshwar yatra | Agrowon

सिद्धेश्‍वर यात्रेतील धार्मिक विधीस प्रारंभ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

सोलापूर : शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर यात्रेच्या धार्मिक विधींना बुधवारी (ता. 10) सुरवात झाली. सकाळी मानकरी मल्लिकार्जुन कुंभार यांच्या निवासस्थानी गणपतीचे व श्री सिद्धरामेश्‍वरांच्या प्रतिमेचे पूजन करून दिवे घालण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पूर्वापार चालत आलेल्या परंपरेप्रमाणे 56 नग मातीच्या घागरी यात्रेचे प्रमुख मानकरी श्री. हिरेहब्बू यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.

सोलापूर : शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर यात्रेच्या धार्मिक विधींना बुधवारी (ता. 10) सुरवात झाली. सकाळी मानकरी मल्लिकार्जुन कुंभार यांच्या निवासस्थानी गणपतीचे व श्री सिद्धरामेश्‍वरांच्या प्रतिमेचे पूजन करून दिवे घालण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पूर्वापार चालत आलेल्या परंपरेप्रमाणे 56 नग मातीच्या घागरी यात्रेचे प्रमुख मानकरी श्री. हिरेहब्बू यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.

या वेळी प्रमुख मानकरी योगिराज म्हेत्रे, मल्लिकार्जुन म्हेत्रे, महादेव म्हेत्रे, रेवणसिद्ध म्हेत्रे, संगण्णा म्हेत्रे, नागनाथ कुंभार, सुरेश म्हेत्रे, माजी नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे यांच्यासह यात्रेतील प्रमुख मानकरी उपस्थित होते. परंपरेप्रमाणे शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांच्या हातातील योगदंड उत्तर कसबा येथील श्री शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून श्री मठपती (स्वामी) शुक्रवार पेठ येथील दिवंगत रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात घेऊन जाण्याची परंपरा 900 वर्षांपासून आहे. त्यानुसार योगदंड बुधवारी शेटे वाड्यात नेण्यात आला. त्या ठिकाणी मानकरी हिरेहब्बू यांचे आगमन झाल्यानंतर योगदंडाची विधिवत पूजा व होमहवन करण्यात आला. त्यानंतर शेटे यांचे वारस ऍड. मिलिंद थोबडे यांनी हिरेबब्बू यांची पाद्यपूजा केली. सिद्धेश्‍वर यात्रेच्या प्रथेप्रमाणे योगदंड पूजनाने सिद्धेश्‍वर यात्रेच्या विधींची सुरवात होते.

आज तैलाभिषेक, कृषी प्रदर्शनाचेही उद्‌घाटन
सिद्धेश्‍वर यात्रेतील मुख्य धार्मिक विधींना शुक्रवारी (ता.12) सुरवात होत आहे. सकाळी बाळीवेशीतून सिद्धेश्‍वरांच्या मानाच्या सातही नंदीध्वजांच्या मिरवणुकीने तैलाभिषेक विधी होईल. यात्रेच्या निमित्ताने कृषी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटनही शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते होईल. 12 ते 16 जानेवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन होणार आहे. सुमारे 200 स्टॉल्स यामध्ये आहेत. शेतीतील विविध तंत्रज्ञानासह माहितीचे विविध स्टॉल्सचा यात समावेश आहे.

इतर ताज्या घडामोडी
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...