agriculture news in marathi, 'Siddheshwar's chimani destroy petition for adjournment was rejected | Agrowon

‘सिद्धेश्‍वर'च्या चिमणी पाडकाम स्थगितीची याचिका फेटाळली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

``विमानसेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी पर्यायी जागेत उभा करण्यासाठी जागा सुचविण्याची मागणी आम्ही वेळेत केली होती. त्यासाठी विमान प्राधिकरणाने आठ महिने घालविले. त्यामुळे वेळेत पर्यायी व्यवस्था करता आली नाही. न्यायालयानेही विमानात बसणाऱ्या प्रवाशांचा विचार केला; परंतु साखर कारखान्यावर उपजीविका असलेले शेतकरी, कामगार, मजूर यांचा विचार केला नाही. या निकालाची प्रत अद्याप मिळालेली नाही. ती मिळाल्यावर आम्ही दाद मागू.``
- धर्मराज काडादी, चेअरमन, सिद्धेश्‍वर साखर कारखाना

``न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्याची सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात आली आहे. चिमणी व विमानसेवा याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी आढावा घेतला आहे. त्यानुसार येत्या काळात कार्यवाही केली जाईल.``
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, सोलापूर

सोलापूर : विमानतळास अडथळा ठरणाऱ्या कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी हटविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.

साखर कारखान्यामध्ये असलेल्या सुमारे ९० फूट चिमणीला हटविण्याच्या आदेशाविरोधात कारखान्याच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. येथील होटगी, विमानतळ परिसराजवळच हा कारखाना आहे. चिमणीच्या उंचीमुळे येथील सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे. तसेच अशाप्रकारे चिमणी असणेदेखील नियमांचे उल्लंघन करणारे आहे, असे मत न्यायालयाने यापूर्वी व्यक्त केले आहे.

विमानतळ परिसरात असलेल्या उंच इमारती किंवा बांधकामामुळे विमान प्रवाशांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्याबाबत मुभा देता येत नाही, असेही न्यायालयाने यापूर्वी स्पष्ट केले होते. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. वाय. एस. जहागीरदार यांच्यासह ॲड. सिद्धार्थ वाकणकर, तर केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी काम पाहिले.

इतर बातम्या
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
फळबागा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळजवळगाव, जि. बीड ः दुष्काळी परिस्थितीने...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...