ब्रॉयलर्सचा बाजार किफायती राहण्याचे संकेत

ब्रॉयलर्सचा बाजार किफायती राहण्याचे संकेत
ब्रॉयलर्सचा बाजार किफायती राहण्याचे संकेत

पुणे ः किरकोळ व संस्थात्मक मागणीचा भक्कम आधार आणि येत्या काळातील उत्सवी माहोलामुळे ब्रॉयलर्स पक्ष्यांना जोरदार उठाव मिळेल, परिमाणी बाजारभावही किफायती राहील, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

ना शिक विभागात शनिवारी (ता. ९) ६७ रु. प्रतिकिलो दराने ब्रॉयलर पक्ष्यांचे फार्म लिफ्टिंग झाले. पुणे विभागात अंड्याचा फार्म लिफ्टिंग दर प्रतिशेकडा ४२१ रुपयांवर स्थिर होता. ब्रॉयलर्सच्या बाजारासंदर्भात नाशिक येथील ज्येष्ठ पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके म्हणाले, ‘‘ओखी वादळामुळे समुद्रातील मासेमारी प्रभावित झाली. बाजारात माशांचा पुरवठा घटला होता. परिणामी चिकनच्या मागणीत वाढ झाली. दुसरा मुद्दा, आजघडीला तंदूर साईजच्या पक्ष्यांसाठी ९२ रु. पर्यंत बाजारभाव मिळत आहे. मोठ्या मालामध्येही पॅनिक सेलिंग नाही. एकूण वातावरण सकारात्मक आहे. वर्षाखेर किफायतशीर असेल’’. 

महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स अॅंड ब्रीडर्स असोसिएशनचे सचिव डॉ. पी. डी. पेडगावकर म्हणाले, ‘‘पंधरवड्यापूर्वी - मागशीर्षच्या पार्श्वभूमीवर बाजारात पॅनिक सेलिंग झाली होती. अनुकूल वातावरणामुळे चांगली वजने आणि मार्गशीर्षची भीती यामुळे बाजाराचे सेंटिमेंट अल्पकाळासाठी खराब झाले. तथापि, ऐन मार्गशीर्षमध्ये बाजारभाव वाढला. नेमके श्रावणात आणि नवरात्रातही असेच झाले होते. सध्या, सगळे जण सारखाच विचार करतात. उपवासाच्या सणांमध्ये माल घेणे टाळतात. मात्र या सणांच्या आधी व नंतर माल दाटतो आणि बाजार पडतो. हे चित्र टाळण्यासाठी आपल्याकडे सातत्यपूर्ण, वर्षाचे ३६५ दिवस माल विक्रीसाठी असणे संयुक्तिक वाटते. दरम्यान, चालू महिना तसेच जानेवारी या काळाचा विचार करता बाजारभाव किफायती राहतील. यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र आवक दाटली; तर बाजार किफायती राहण्याबद्दल साशंकता आहे. एव्हढा अपवाद सोडला तर बाजारभाव खाली यावा, अशी परिस्थिती नाही,’’ असे डॉ. पेडगावकर म्हणाले.

‘‘सध्या पिलांचे भाव उंच आहेत. या परिस्थितीत तंदूर मालाच भावा पाहता, फारशी अडचण यावी, अशी परिस्थिती नाही. पण सगळ्यांनीच पिलांचा खर्च कमी करण्यासाठी तीन किलोचे पारंपरिक समीकरण अमलात आणले तर कठीण परिस्थिती ओढावते, हे आपण पाहिले आहे,’’ असे निरीक्षण नोंदवून डॉ. पेडगावकर म्हणाले, ‘‘गेल्या वर्षभरापासून लहान शेतकऱ्यांसाठी बाजारभाव आणि पिलांची उपलब्धता ही अडचणीची बाब ठरली आहे, हे खरे. पण, यामागची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. दोन वर्षांपूर्वी बाजारातील मागणीपेक्षा ब्रॉयलर्सचा पुरवठा वाढत होता. त्यामुळे बाजारभावात दीर्घकाळ मंदी राहत होती. पुरवठा संतुलित करण्यासाठी उत्पादन सुयोग्य पातळीवर ठेवणे गरजेचे होते. तशी मागणीही पोल्ट्री उद्योगाकडून झाली होती. परिणामी, पिलांचा पुरवठा घटला. पिलांचा पुरवठा एकदम वाढवता येत नाही. किमान आठ महिन्यांचे च्रक त्यासाठी जावे लागते. शिवाय, एखादे धोरण निश्चित केल्यावर तत्काळ मागे घेणे अवघड असते. मात्र, आता बदलती परिस्थिती लक्षात घेत मागणीनुसार पुन्हा पिलांचा पुरवठा वाढण्याचे धोरण पोल्ट्री उद्योगाने आखले असून, येत्या वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीपासून पिलांचा पुरवठा सुरळीत होईल.’’  

प्रकार     भाव     परिमाण     बाजारपेठ
ब्रॉयलर     ६७     प्रतिकिलो     नाशिक
अंडी     ४२१     प्रतिशेकडा     पुणे
चिक्स     ४३     प्रतिनग     पुणे
हॅचिंग एग्ज  ३३.५०     प्रतिनग     मुंबई
मका     १२६०     प्रतिक्विंटल     सांगली
सोयामिल     २३,४००     प्रतिटन     इंदूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com