agriculture news in Marathi, sign of broiler market will be reasonable, Maharashtra | Agrowon

ब्रॉयलर्सचा बाजार किफायती राहण्याचे संकेत
दिपक चव्हाण
सोमवार, 11 डिसेंबर 2017

पुणे ः किरकोळ व संस्थात्मक मागणीचा भक्कम आधार आणि येत्या काळातील उत्सवी माहोलामुळे ब्रॉयलर्स पक्ष्यांना जोरदार उठाव मिळेल, परिमाणी बाजारभावही किफायती राहील, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

पुणे ः किरकोळ व संस्थात्मक मागणीचा भक्कम आधार आणि येत्या काळातील उत्सवी माहोलामुळे ब्रॉयलर्स पक्ष्यांना जोरदार उठाव मिळेल, परिमाणी बाजारभावही किफायती राहील, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

ना शिक विभागात शनिवारी (ता. ९) ६७ रु. प्रतिकिलो दराने ब्रॉयलर पक्ष्यांचे फार्म लिफ्टिंग झाले. पुणे विभागात अंड्याचा फार्म लिफ्टिंग दर प्रतिशेकडा ४२१ रुपयांवर स्थिर होता. ब्रॉयलर्सच्या बाजारासंदर्भात नाशिक येथील ज्येष्ठ पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके म्हणाले, ‘‘ओखी वादळामुळे समुद्रातील मासेमारी प्रभावित झाली. बाजारात माशांचा पुरवठा घटला होता. परिणामी चिकनच्या मागणीत वाढ झाली. दुसरा मुद्दा, आजघडीला तंदूर साईजच्या पक्ष्यांसाठी ९२ रु. पर्यंत बाजारभाव मिळत आहे. मोठ्या मालामध्येही पॅनिक सेलिंग नाही. एकूण वातावरण सकारात्मक आहे. वर्षाखेर किफायतशीर असेल’’. 

महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स अॅंड ब्रीडर्स असोसिएशनचे सचिव डॉ. पी. डी. पेडगावकर म्हणाले, ‘‘पंधरवड्यापूर्वी - मागशीर्षच्या पार्श्वभूमीवर बाजारात पॅनिक सेलिंग झाली होती. अनुकूल वातावरणामुळे चांगली वजने आणि मार्गशीर्षची भीती यामुळे बाजाराचे सेंटिमेंट अल्पकाळासाठी खराब झाले. तथापि, ऐन मार्गशीर्षमध्ये बाजारभाव वाढला. नेमके श्रावणात आणि नवरात्रातही असेच झाले होते. सध्या, सगळे जण सारखाच विचार करतात. उपवासाच्या सणांमध्ये माल घेणे टाळतात. मात्र या सणांच्या आधी व नंतर माल दाटतो आणि बाजार पडतो. हे चित्र टाळण्यासाठी आपल्याकडे सातत्यपूर्ण, वर्षाचे ३६५ दिवस माल विक्रीसाठी असणे संयुक्तिक वाटते.

दरम्यान, चालू महिना तसेच जानेवारी या काळाचा विचार करता बाजारभाव किफायती राहतील. यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र आवक दाटली; तर बाजार किफायती राहण्याबद्दल साशंकता आहे. एव्हढा अपवाद सोडला तर बाजारभाव खाली यावा, अशी परिस्थिती नाही,’’ असे डॉ. पेडगावकर म्हणाले.

‘‘सध्या पिलांचे भाव उंच आहेत. या परिस्थितीत तंदूर मालाच भावा पाहता, फारशी अडचण यावी, अशी परिस्थिती नाही. पण सगळ्यांनीच पिलांचा खर्च कमी करण्यासाठी तीन किलोचे पारंपरिक समीकरण अमलात आणले तर कठीण परिस्थिती ओढावते, हे आपण पाहिले आहे,’’ असे निरीक्षण नोंदवून डॉ. पेडगावकर म्हणाले, ‘‘गेल्या वर्षभरापासून लहान शेतकऱ्यांसाठी बाजारभाव आणि पिलांची उपलब्धता ही अडचणीची बाब ठरली आहे, हे खरे. पण, यामागची परिस्थिती समजून घ्यावी लागेल.

दोन वर्षांपूर्वी बाजारातील मागणीपेक्षा ब्रॉयलर्सचा पुरवठा वाढत होता. त्यामुळे बाजारभावात दीर्घकाळ मंदी राहत होती. पुरवठा संतुलित करण्यासाठी उत्पादन सुयोग्य पातळीवर ठेवणे गरजेचे होते. तशी मागणीही पोल्ट्री उद्योगाकडून झाली होती. परिणामी, पिलांचा पुरवठा घटला. पिलांचा पुरवठा एकदम वाढवता येत नाही. किमान आठ महिन्यांचे च्रक त्यासाठी जावे लागते. शिवाय, एखादे धोरण निश्चित केल्यावर तत्काळ मागे घेणे अवघड असते. मात्र, आता बदलती परिस्थिती लक्षात घेत मागणीनुसार पुन्हा पिलांचा पुरवठा वाढण्याचे धोरण पोल्ट्री उद्योगाने आखले असून, येत्या वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीपासून पिलांचा पुरवठा सुरळीत होईल.’’
 

प्रकार     भाव     परिमाण     बाजारपेठ
ब्रॉयलर     ६७     प्रतिकिलो     नाशिक
अंडी     ४२१     प्रतिशेकडा     पुणे
चिक्स     ४३     प्रतिनग     पुणे
हॅचिंग एग्ज  ३३.५०     प्रतिनग     मुंबई
मका     १२६०     प्रतिक्विंटल     सांगली
सोयामिल     २३,४००     प्रतिटन     इंदूर

   
 

इतर अॅग्रोमनी
हळद वगळता सर्व शेतमालाचे भाव तेजीतया सप्ताहात साखर, सोयबीन व हळद वगळता सर्व पिकांचे...
कापूस कोंडी टाळण्यासाठी मिशन मोडवर काम...भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक...
हळद, हरभऱ्याच्या फ्युचर्स भावात चढ -...या सप्ताहात कापूस, गवार बी व हरभरा वगळता सर्व...
इंटरनेटद्वारे कृषिमालाचे प्रभावी विपणनएकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने...
पुढील काही महिने हळदीच्या दरावर ठेवा...या सप्ताहात सोयाबीन व गहू वगळता सर्व पिकांचे भाव...
ऑक्टोबरमध्ये प्रथमच ब्रॉयलर बाजार...ब्रॉयलर्सचे बाजारभाव वर्षातील उच्चांकी पातळीवर...
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची गोचीकोणतेही तातडीचे, आतबट्टायचे काम करायचे असेल तर...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
व्यापारी बँका वित्तीय निरक्षरतेचा फायदा...व्यापारी बँका सामान्य कर्जदारांमधील वित्तीय...
संतुलित पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सच्या...नवरात्रोत्सवामुळे चिकनच्या सर्वसाधारपण खपात मोठी...
नवीन हंगामात कापसाची अडखळती सुरवातदेशात कापसाच्या २०१८-१९ च्या नवीन विपणन हंगामाची...
हमीभाव मनमोहनसिंग सरकारपेक्षा कमी;...नरेंद्र मोदी सरकारने जुलै महिन्यात पिकांच्या...
तेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून '...अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज...
थेट विक्रीचे देशी मॉडेलमहाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पुढाकारातून सेंद्रिय व...
शेतीशी नाळ जोडणारा फॅब्रिकेशन व्यवसायफॅब्रिकेशन व्यवसाय एक उत्तम लघू उद्योग आहे. या...
हेमंतरावांची शेती नव्हे ‘कंपनी’च!लखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत...
खरीप मका, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात कापूस, रब्बी मका, सोयाबीन व हरभरा...
कृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...
सोयाबीन, कापूस वगळता इतर पिकांच्या...या सप्ताहात सोयाबीन व कापूस वगळता इतर वस्तूंच्या...
सोयामील निर्यात ७० टक्के वाढण्याचा अंदाजदेशाची सोयामील (सोयापेंड) निर्यात २०१८-१९ या...