agriculture news in Marathi, Sign of increase rates of guar, Onion, Banana in Jalgaon, Maharashtra | Agrowon

जळगावात गवार, कांदा, केळीत तेजीचे संकेत
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

जळगाव ः बाजारात गत आठवड्यात गवार व कांदा यांची आवक काहीशी घटली. गवारला प्रतिक्विंटल सरासरी तीन हजार रुपये तर कांद्यालाही सरासरी साडेतीन हजार रुपये दर एक क्विंटलमागे मिळाला. तसेच केळीचे दरही ९५० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर होते. निर्यातक्षम केळीचा तुटवडा असून, पुढे दरवाढीचे संकेत गवार, केळीसंबंधी मिळत आहेत. 

जळगाव ः बाजारात गत आठवड्यात गवार व कांदा यांची आवक काहीशी घटली. गवारला प्रतिक्विंटल सरासरी तीन हजार रुपये तर कांद्यालाही सरासरी साडेतीन हजार रुपये दर एक क्विंटलमागे मिळाला. तसेच केळीचे दरही ९५० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर होते. निर्यातक्षम केळीचा तुटवडा असून, पुढे दरवाढीचे संकेत गवार, केळीसंबंधी मिळत आहेत. 

बाजार समितीमध्ये गवारची आवक प्रतिदिन अडीच क्विंटल एवढी राहिली. तिला एकच दर होता. सरासरी तीन हजार रुपये क्विंटल दर कायम राहिला. दोन दिवस ३२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कांद्याची प्रतिदिन आवक २०० क्विंटल होती. त्याला प्रतिक्विंटल १६०० ते चार हजार आणि सरासरी साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. लाल कांद्याची आवक अधिक राहिली. पांढऱ्या कांद्याची आवक प्रतिदिन २० क्विंटलपर्यंत होती.

मागील सप्ताहात बटाट्याची प्रतिदिन आवक २५० क्विंटल होती. त्याला ३५० ते ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. सरासरी ३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. भरीताच्या वांग्याची प्रतिदिन २३ क्विंटल आवक होती. त्याला ६०० ते १२०० आणि सरासरी ९०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. टोमॅटोची प्रतिदिन २० क्विंटल आवक राहिली. त्याला ८०० ते १२०० आणि सरासरी एक हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मेथीची प्रतिदिन सात क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ७०० ते १००० आणि सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

पेरूची आवक प्रतिदिन पाच क्विंटल होती. त्याला प्रतिक्विंटल ८०० ते १२०० रुपये आणि सरासरी ९०० प्रतिक्विंटलचा दर राहिला. सोयाबीनची आवक प्रतिदिन २०० क्विंटल होती. त्याला २६०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. उडदासह मुगाच्या आवकेत घट झाली. त्यांना प्रतिक्विंटल कमाल ४८०० रुपयांपर्यंत दर होता, अशी माहिती मिळाली. 

केळीचे दर स्थिर
कांदेबाग केळीचे दर स्थिर होते. चोपडा व जळगाव, जामनेरातच कांदेबाग आहेत. रावेर, यावलमध्ये जुनारी केळी काही प्रमाणात आहे. सध्या थंडीमुळे केळी परिपक्व होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. दुसऱ्या बाजूला निर्यातक्षम केळीचा तुटवडा होता. कांदेबाग केळीला (साधारण) प्रतिक्विंटल ९५० रुपये दर मिळाला. तर जुनारीचे दरही ८०० रुपये प्रतिक्विंटल राहीले.

चोपडा तालुक्‍यातील सातपुडा पर्वतालगतच्या गावांमध्ये पिकणाऱ्या निर्यातक्षम कांदेबाग केळीला १२०० रुपये प्रतिक्विंटल म्हणजेच ऑन प्रकारचे दर मिळाले. पंजाब, दिल्ली, हरियाना, उत्तराखंड येथून केळीला मागणी आहे. जम्मू येथील केळी निर्यात मागील आठवड्यात ठप्प होती. मुंबई येथूनही केळीची मागणी कायम राहिली. त्यामुळे बिगर निर्यातक्षम केळीच्या दरात घसरण झाली नाही, अशी माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...