agriculture news in marathi, for signature authority sirpanch would go through exam | Agrowon

सरपंचांना सह्याच्या अधिकारासाठी आता परीक्षा
सूर्यकांत नेटके
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नगर ः सरकारने सरपंचाची निवड जनतेतून सुरू केली आहे. हा क्रांतिकारक बदल यशस्वीही झाला असून, राज्यात आत्तापर्यंत सात हजार ३०० सरपंच थेट जनतेतून निवडले आहेत; मात्र आता त्या सरपंचांना सह्यांचे अधिकार शाबूत ठेवायचे असतील, तर त्यांना शासनाची ‘परीक्षा’ देऊन ती उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. परीक्षेत ‘फेल’ झालेल्या सरपंचांना सह्याच्या अधिकारापासून मुकावे लागणार आहे. 

नगर ः सरकारने सरपंचाची निवड जनतेतून सुरू केली आहे. हा क्रांतिकारक बदल यशस्वीही झाला असून, राज्यात आत्तापर्यंत सात हजार ३०० सरपंच थेट जनतेतून निवडले आहेत; मात्र आता त्या सरपंचांना सह्यांचे अधिकार शाबूत ठेवायचे असतील, तर त्यांना शासनाची ‘परीक्षा’ देऊन ती उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. परीक्षेत ‘फेल’ झालेल्या सरपंचांना सह्याच्या अधिकारापासून मुकावे लागणार आहे. 

राज्य सरकार त्याबाबत लवकरच नियम करणार असल्याचे राज्याच्या राज्य आदर्श गाव योजना समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी तसे सूतोवाच केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी करून थेट जनतेतून सरपंच झालेल्यांना आता गावकीची सत्ता हाकताना आणखी एका अडचणीला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट झाले आहे. 

शासनाने नगरपंचायत, नगरपालिकांचे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याच्या निर्णयानंतर गावकारभारी अशी ओळख असलेल्या सरपंचांचीही यंदापासून थेट जनतेतून निवड केली आहे. आतापर्यंत राज्यातील सत्तावीस हजार ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत राज्यात ७ हजार ३०० सरपंच थेट जनतेतून निवडले आहेत. बऱ्याच ठिकाणी सुशिक्षित व तरुणांना सरपंचपदावर संधी मिळालेली असली तरी बऱ्याच गावांत प्रस्थापितांनी पैशाच्या जोरावर पद मिळवले असल्याचे चित्र आहे. गावांच्या विकासात तरुणांनी योगदान द्यावे, शिकलेल्यांना सरपंचपदाची संधी मिळावी, यासाठी शासनाने थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतलेला आहे.

शासनाचा बहुतांश निधी थेट ग्रामपंचायतीला दिला जात आहे. त्याचा विनियोग योग्य पद्धतीने होऊन ग्रामविकासाला चालना मिळावी, यासाठी सरपंचांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातून त्यांची लेखी परीक्षा होणार असून, त्यात पास होणाऱ्या सरपंचांनाच सह्यांचे अधिकार मिळणार आहेत. त्यासाठी राज्य पातळीवर अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू आहे. परीक्षेत नापास झालेल्या सरपंचांना सह्याच्या अधिकाराला मुकावे लागणार आहे. पोपटराव पवार यांनी दिलेल्या या माहितीमुळे अनेक सरपंचांची मात्र अडचण होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...