agriculture news in marathi, Signs of early completion of Hingoli, Nanded, Parbhani Cotton season | Agrowon

मराठवाड्यात कपाशीचा हंगाम लवकर आटोपण्याची चिन्हे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाच्या दीर्घ खंडामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. उन्हामुळे कोरडवाहू क्षेत्रातील हलक्या, बरड जमिनीवरील कपाशीची सर्वच बोंडे फुटली आहेत. अनेक ठिकाणी एकाच वेचणीनंतर केवळ पऱ्हाटी शिल्लक राहत आहे. जमिनीत ओलावा नसल्यामुळे पाते, फुले, बोंडे लागण्याची शक्यता नाही. त्यामुळे यंदा कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीचा हंगाम लवकरच आटोपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाच्या दीर्घ खंडामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. उन्हामुळे कोरडवाहू क्षेत्रातील हलक्या, बरड जमिनीवरील कपाशीची सर्वच बोंडे फुटली आहेत. अनेक ठिकाणी एकाच वेचणीनंतर केवळ पऱ्हाटी शिल्लक राहत आहे. जमिनीत ओलावा नसल्यामुळे पाते, फुले, बोंडे लागण्याची शक्यता नाही. त्यामुळे यंदा कोरडवाहू क्षेत्रातील कपाशीचा हंगाम लवकरच आटोपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

गतवर्षी बोंड अळीमुळे नुकसान झाल्यामुळे यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कपाशीच्या क्षेत्रात मोठी घट झाली. या तीन जिल्ह्यांत कपाशीचे सरासरी क्षेत्र ६ लाख १५ हजार ४८५ हेक्टर असताना यंदा प्रत्यक्षात ४ लाख ८६ हजार हेक्टरवर लागवड झाली.

यंदा जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात लागवड झालेल्या कपाशीवर लवकरच बोंड अळीचा प्राद्रुर्भाव झाला. त्यानंतर जुलै-आॅगस्ट महिन्यात आणि आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यांत वाढीच्या तसेच परिपक्वतेच्या अवस्थेत पावसाचा दीर्घ खंड पडला. परिणामी वाढ खुंटली. बोंडे पूर्णपणे भरली नाहीत. अनेक भागात कपाशीच्या झाडावरील सर्वच बोंडे फुटली आहेत. केवळ एकाच वेचणीनंतर केवळ नख्या आणि पऱ्हाटी शिल्लक राहत आहे. त्यामुळे यंदा कोरडवाहू क्षेत्रातील कापूस हंगाम दिवाळीपूर्वीच आटोपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पावसाअभावी कपाशीची पाने गळाल्याने लवकरच झाडपाला वाळून गेला. त्यामुळे झाडांना पाणी देऊन उपयोग होत नाही. एक वेचणी झाली दुसरी सुरू आहे. बोंड अळीग्रस्त बोंडातील कापूस व्यवस्थित वेचता येत नाही, तिसरी वेचणी होण्याची शक्यता नाही. यंदा दिवाळीच्या आधीच कापसाचा हंगाम संपणार आहे.
- अकुंश वानखेडे, शेतकरी, कपालेश्वर बीट सावंगी, ता. लोहा, जि. नांदेड

बरड्या रानातील बारीक बोंडे करपून गेली. उतारा घटला आहे. जेमतेम महिन्याच्या आतच कापसाचा हंगाम संपणार आहे.
- विष्णू निर्वळ, शेतकरी, रुढी, ता. मानवत, जि. परभणी

पावसाच्या दीर्घ खंडामुळे यंदा विशेषतः हलक्या जमिनीवरील कपाशीमध्ये लवकर परिपक्वता आली. पाऊस आल्यानंतर भारी जमिनीवरील हिरव्या कपाशीच्या पिकाला बहर फुटू शकतो.
- डॉ. के. एस. बेग, प्रभारी अधिकारी वनामकृवि, कापूस संशोधन केंद्र, नांदेड

इतर ताज्या घडामोडी
सागरी नत्र साखळीतील महत्त्वाच्या...सागरी पाण्यातील अमोनिया ऑक्सिडेशन करणारे...
पुणे जिल्ह्यात ३७ लाख ३३ हजार टन ऊस...पुणे ः पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा गळीत...
नांदेड विभागात २८ लाख क्विंटल साखरेचे...नांदेड ः नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री...जत, जि. सांगली ः तुबची बबलेश्वर (कर्नाटक)...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२००...सोलापुरात सर्वाधिक दर ८०० रुपये सोलापूर ः...
दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा...बुलडाणा ः सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे...
सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्रीजळगाव  : खानदेशात पपई उत्पादकांना सव्वाआठ...
केळी दरांची अंमलबजावणी होईनाजळगाव : खानदेशात केळीच्या दरांबाबत दबाव...
मराठा आरक्षण : ज्येष्ठ विधिज्ञ हरीश...मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि...
जिनिंग मालकाने शेतकऱ्याला घ्यायला लावली...वर्धा : एका हातात पाण्याचा ग्लास आणि दुसऱ्या...
स्वतंत्र भारत पक्षाकडून ‘आपले सरकार’चा...नगर : राज्यात आणि देशात शेतकऱ्यांची लूट करणारे...
ढगाळ वातावरण, भुरीच्या धोक्याकडे लक्ष...बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वादळाचा परिणाम...
पीकविम्याच्या हप्त्याची वेळ अत्यंत...हवामानातील विविध घटकांमुळे पिकांचे अनेक वेळा...
खानदेशात रब्बीचे ७९ टक्के क्षेत्र नापेरजळगाव :खानदेशात रब्बी पिकांमध्ये मका, गव्हाची...
फरदड कपाशीचे उत्पादन टाळावे ः कुलगुरू...नांदेड ः आगामी खरीप हंगामामध्ये कपाशीवर गुलाबी...
पायाभूत सुविधांअभावी रेशीम उत्पादक...बीड : रेशीम कोष उत्पादन वाढीसाठी महारेशीम अभियान...
‘एफआरपी’ थकविलेल्या कारखान्यांना दणकाकोल्हापूर : हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी...
अकोल्यात ‘अात्मा’ शेतकरी सल्लागार...अकोला ः शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवण्‍...
भंडारा जिल्ह्यातील भूजल पातळी खोलभंडारा : जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या...
साताऱ्यात गवार प्रतिदहा किलो ३०० ते ४५०...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...