agriculture news in marathi, signs of getting back the development fee for market committee,pune, maharashtra | Agrowon

बाजारसमित्यांना विकसन शुल्क परत मिळण्याची चिन्हे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

पुणे  ः बाजार समित्यांच्या विकास कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घेण्यात येणारे विकसन शुल्क परत मिळण्याची चिन्हे आहेत. एप्रिल २००० या वर्षातील एका शासन निर्णयाचा अाधार घेत पुणे बाजार समितीने फूल बाजारासह विविध विकास कामांसाठी वेळावेळी भरलेले सुमारे ७ काेटी रुपये शुल्क परत द्यावे, अशी मागणी पुणे महानगरपालिकेकडे केली आहे. या पत्रावर विभागीय आयुक्तांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला असून, हे शुल्क मिळाल्यास राज्यातील विविध बाजार समित्यांसाठी हा निर्णय दिलासादायी ठरणार आहे.

पुणे  ः बाजार समित्यांच्या विकास कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घेण्यात येणारे विकसन शुल्क परत मिळण्याची चिन्हे आहेत. एप्रिल २००० या वर्षातील एका शासन निर्णयाचा अाधार घेत पुणे बाजार समितीने फूल बाजारासह विविध विकास कामांसाठी वेळावेळी भरलेले सुमारे ७ काेटी रुपये शुल्क परत द्यावे, अशी मागणी पुणे महानगरपालिकेकडे केली आहे. या पत्रावर विभागीय आयुक्तांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला असून, हे शुल्क मिळाल्यास राज्यातील विविध बाजार समित्यांसाठी हा निर्णय दिलासादायी ठरणार आहे.

याबाबतची माहिती पुणे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. देशमुख म्हणाले, की पुणे बाजार समितीची विविध विकासकामे प्रस्तावित असून, अनेक कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांसाठी महानगरपालिकेकडून विकसन शुल्क आकारले जात आहे. मात्र, एप्रिल २००० मधील शासन निर्णयानुसार असे विकसन शुल्क स्थानिक स्वराज संस्थांना आकारता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे या अध्यादेशाचा आधार घेत बाजार समितीने महानगरपालिकेला विकसन शुल्क परत करावे, असे पत्र दिले आहे. या पत्राबाबत विभागीय आयुक्तांनी देखील सकारात्मक विचार केला असून, लवकरच निर्णय हाेऊन विकसन शुल्क परत मिळेल.

दरम्यान, बाजार आवारातील पार्किंग आणि व्यावसायिक इमारतीच्या परवानगीसाठी पुणे महापालिकेने बाजार समितीकडे सुमारे सात कोटी रुपये विकसन शुल्क मागितले होते. हे शुल्कदेखील भरावे लागणार नसल्याने बाजार समितीचे फूल बाजाराचे ७ आणि पार्किंगसाठीचे ७ काेटी असे १४ काेटी रुपये वाचणार आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...