Agriculture News in Marathi, Sikkim has produced various organic vegetables, India | Agrowon

सिक्कीममध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादन ८० हजार टन
वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017
गंगटोक, सिक्कीम ः सिक्कीमची संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य म्हणून घोषणा झाल्यानंतर २०१६-१७ या वर्षात या राज्यात ८० हजार टन विविध भाजापाल्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यात अाले अाहे. 
 
गंगटोक, सिक्कीम ः सिक्कीमची संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य म्हणून घोषणा झाल्यानंतर २०१६-१७ या वर्षात या राज्यात ८० हजार टन विविध भाजापाल्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यात अाले अाहे. 
 
गेल्या वर्षी १८ जानेवारी २०१६ रोजी सिक्कीमची संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य म्हणून घोषणा करण्यात अाली होती. रासायनिक खते, कीटनाशकांच्या वापरावर निर्बंध, पर्यावरणपूरक शेतीवर भर, शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शेतमालाचे ब्रॅडिंग केल्याने सिक्कीममधील सेंद्रिय शेती फायदेशीर ठरली अाहे. येथील शेतीत भात, मका, लसूण, हळद, बकव्हीट ही प्रमुख पिके घेतली जातात.
 
‘‘गेल्या वर्षी सेंद्रिय पद्धतीने ८० हजार टन भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात अाले. सेंद्रिय शेतीप्रती बांधिलकी जपत हे उत्पादन घेतले अाहे,’’ असे राज्याच्या फलोत्पादन अाणि नगदी पिके विकास खात्याचे सचिव खोर्लो भूतिया यांनी सांगितले. भाजीपाल्याचे उत्पादन हे रसायनकमुक्त घेतले जात अाहे. एकूण ७६,३९२ हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली प्रमाणित केले अाहे. त्यापैकी १४ हजार हेक्टरवर सेंद्रिय पद्धतीने शेतपिकांची लागवड केली अाहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
 
राज्य भाजीपाला उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी १०० मेट्रिक टन उत्पादन कमी पडत अाहे. त्यासाठी टप्प्प्याटप्प्याने सेंद्रिय शेती अभियान राबविले जात असून, हळूहळू प्रमाणित क्षेत्र लागवडीखाली अाणले जाणार अाहे. पहिल्या टप्प्यात १४ हजार हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली अाणण्यात अाले अाहे. २०१८ पर्यंत निश्चित केलेल्या क्षेत्रावर सेंद्रिय शेती, पीक काढणी पश्चात व्यवस्थापन, प्रक्रिया, ब्रॅडिंग, विपणन अादी गोष्टी पूर्ण केल्या जाणार अाहे, असेही भूतिया यांनी सांगितले.
 
फळे, मसाला पिकांचे उत्पादन 
सिक्कीममध्ये १०० मेट्रिक टन चेरी पेपर्स, १०० क्विंटल किवी फळाचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यात अाले अाहे. त्याशिवाय वेलदोडे, अाले, हळद, बकव्हीट अादी पिके प्रायोगिक तत्त्वावर घेतली जात अाहेत.
 
२४ हजार शेतकरी करतात सेंद्रिय शेती
सिक्कीमधील २८ शेतकरी संघटनांमधील २४ हजार शेतकरी सेंद्रिय पद्धतीने विविध पिकांचे उत्पादन घेत अाहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालास जास्तीत जास्त दर मिळावा यासाठी पणन यंत्रणा विकसित करण्याची गरज अाहे. त्यासाठी शेतकरी सहकारी सोसायटी स्थापन करण्यात अाली अाहे.
 
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची रक्कम ई-व्हाऊचर पद्धतीने दिली जाणार अाहे, असेही नगदी पिके विकास खात्याचे सचिव भूतिया म्हणाले.

इतर अॅग्रो विशेष
जगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणीपुणे : निर्यातीत युरोपीय देशांप्रमाणे अन्य...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी :...नवी दिल्ली  : २०१९ मध्ये सत्तेत आल्यास...
त्रिगुणी म्हशीची विजयी पताकाजगात सर्वप्रथम हॅंड गाईडेड क्लोनिंग म्हणजे हस्त...
जाणिवेचा लॉंग मार्चशेतकरी संपामुळे सरकारला कर्जमाफीची घोषणा...
विदर्भात विस्तारतो आहे पोल्ट्री व्यवसायकडक उन्हाळ्यामुळे पोल्ट्री व्यवसाय विदर्भामध्ये...
तुरळक पावसाचा अंदाज; तापमान वाढणारपुणे : राज्यात सोमवारी (ता. १९) मध्य महाराष्ट्र,...
कृषी योजनांचा निधी खर्च करण्यात अपयशपुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांचा निधी...
शेतकरी आत्महत्यांचे सरकारला काहीच वाटत...राळेगणसिद्धी, जि. नगर : ‘‘लोकपाल आणि लोकायुक्त...
कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज माफ;...बारामती, पुणे ः "छत्रपती शिवाजी महाराज...
अवजारांची गुणवत्ता हाच बनलाय ब्रॅंडगिरणारे (जि. नाशिक) गावातील पिंकी सुधाकर पवार...
‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन्‌ सौर...पुणे येथील ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी...
'कृषी उद्योग'मधील वादग्रस्त सूर्यगण...पुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील...
‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’...पुणे : डाळिंब पिकात केवळ सातच लेबल क्लेम...
बोंड अळी, धान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी...पुणे : बाेंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान...
बेदाण्याचे यंदा तीस टक्केच उत्पादनसांगली : राज्यात दरवर्षी सुमारे २ लाख टन...
हमीभावाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले...नवी दिल्ली : उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक...पुणे : राज्यावर अवकाळीचे ढग असल्याने पावसाचे सावट...
आसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वीहिस्सार, हरियाणा : येथील केंद्रीय म्हैस संशोधन...
राज्यात १५ लाख टन साखर उत्पादन वाढलेकोल्हापूर : राज्यात सुरू हंगामात यंदा अंदाजपेक्षा...