सोलापुरात हिरजला होणार रेशीम पार्क

सोलापुरात हिरजला होणार रेशीम पार्क
सोलापुरात हिरजला होणार रेशीम पार्क

सोलापूर : हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे रेशीम पार्क उभारणीसाठी ६ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. यामुळे सोलापुरात रेशीम पार्कअंतर्गत कोष बाजारपेठ उभारण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख हे गेल्या काही वर्षांपासून यासाठी प्रयत्नशील होते. पश्‍चिम महाराष्ट्रातील उसाप्रमाणे मराठवाड्यात तुतीच्या शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे जालना व बीड जिल्ह्यांनंतर संपूर्ण मराठवाडा या शेतीकडे वळला आहे. सध्या पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरीही या शेतीकडे वळत असून, त्यांच्या शेतात इतर पिकांची जागा तुतीच्या शेतीने घेतली आहे. याचे क्षेत्र सांगली, पुणे व सोलापूर जिल्ह्यांतही वाढत आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर कर्नाटकात ही शेती करण्यात येते. मराठवाडा, सांगली, पुणे, सोलापूर आणि कर्नाटकासाठी मध्यवर्ती बाजारपेठ सोलापुरात व्हावी, यासाठी हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे रेशीम पार्क उभारणीसाठी १० एकर जमीन घेण्यात आली आहे.

पार्कच्या उभारणीसाठी देशमुख यांनी नागपूर रेशीम संचनालयामार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यातून रेशीम पार्कसाठी इमारत व अन्य सुविधासाठी सहा कोटी ४५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. मराठवाड्यातही रेशीम पार्क उभारणीसाठी गत वर्षी सहा कोटी १९ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

निधीतून होणारी कामे जमीन सपाटीकरण, संरक्षण भिंत, वीज, पाणी, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, संशोधन, खरेदी, प्रक्रिया केंद्र, कार्यालयासाठी इमारत व अन्य सुविधा या निधीतून उभारण्यात येणार आहेत. कमी पाण्यावर अधिक उत्पन्न मिळवून देणारे हे पीक असल्याने दुष्काळामुळे शेतकरी या पिकाकडे वळत आहेत. वर्षभर उत्पादन घेण्यात येणार असल्याने व हिरज येथे संशोधन, खरेदी केंद्र होणार असल्याने याची माहिती व मार्गदर्शनही उत्पादकांना मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com