agriculture news in marathi, Silk Board Positive | Agrowon

रेलिंग युनिट देण्यासाठी रेशीम बोर्ड सकारात्मक
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

जालना : उत्पादित रेशीम कोषाच्या मूल्यवर्धनासाठी धागा निर्मितीही मराठवाड्यात अर्थातच राज्यातच होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी लागणारे रेलिंग युनिट देण्यासाठी केंद्रीय रेशीम बोर्ड सकारात्मक असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष हनुमंत रायप्पा यांनी स्पष्ट केले.

जालना : उत्पादित रेशीम कोषाच्या मूल्यवर्धनासाठी धागा निर्मितीही मराठवाड्यात अर्थातच राज्यातच होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी लागणारे रेलिंग युनिट देण्यासाठी केंद्रीय रेशीम बोर्ड सकारात्मक असल्याचे बोर्डाचे अध्यक्ष हनुमंत रायप्पा यांनी स्पष्ट केले.

जालना जिल्ह्यातील देवमूर्ती येथील स्वयंचलित रेलिंग युनिट, जालना बाजार समितीमधील प्रायोगिक तत्त्वारील रेशीम कोष खरेदी बाजारपेठ, जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालय तसेच कचरेवाडी येथील चॉकी रेअरिंग सेंटरची केंद्रीय रेशीम बोर्डाचे अध्यक्ष श्री हनुमंत रायप्पा यांनी गुरुवारी (ता. ६) पाहणी केली. देवमूर्ती येथील स्वयंचलित रेलिंग युनिटला भेट दिल्यानंतर निर्माण होणाऱ्या धाग्याबाबत श्री. रायप्पा यांनी समाधान व्यक्‍त केले. त्यानंतर त्यांनी जालना बाजार समितीमधील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेला भेट दिली.

यावेळी कोष विक्रीसाठी आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील नेर व इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. कोष खरेदीची व्यवस्था, पद्धत याविषयीही त्यांनी माहिती जाणून घेतली.  यावेळी श्री. रायप्पा म्हणाले, भारतात कॉफी, चहानंतर शाश्वत सर्वाधिक उत्पन्न देणारे रेशीमच आहे. मराठवाड्यातील रेशीम उद्योगाच्या विस्तारासाठी उत्पादित कोषावर मराठवाड्यात प्रक्रिया होऊन धागा तयार होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे मूल्यवर्धन होण्यास मदत होईल. त्यामुळे आवश्‍यक तेवढे रेलिंग युनिट देण्यास केंद्रीय रेशीम बोर्ड तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या भेटीवेळी मराठवाडा रेशीम विभागाचे सहायक संचालक दिलीप हाके, जिल्हा रेशीम विकास अधिकारी व्ही. एम. भांगे, वरिष्ठ तांत्रिक सहायक अजय मोहिते, शास्त्रज्ञ राहुल सिंह, धारवाडचे बसवराज व विजयकुमार आदींची उपस्थिती होती. राज्यात सध्या जालना व भंडारा या दोनच ठिकाणी स्वयंचलित रेलिंग युनिट कार्यान्वित आहेत.

सांगली येथे तिसरे स्वयंचलित रेलिंग युनिट मंजूर करण्यात आले आहे. शिवाय सोलापूर येथेही रेलिंग युनिट प्रस्तावित आहे.  मराठवाड्यातील रेशीम कोषाचे उत्पादन पाहता आणखी पाच रेलिंग युनिट मराठवाड्यातच कार्यान्वित होऊ शकतात, अशी माहिती रेशीम विभागाच्या सूत्रांनी दिली.

इतर बातम्या
कपाशीच्या नांदेड ४४ बीटी बियाण्याची ५...परभणी ः महाबीज आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा...वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
शेतीमालाच्या काढणीपश्चात तंत्रज्ञानावर...नाशिक :  ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
रायवाडी तलावातून १५ हजार ब्रास गाळ काढलासांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्वाधिक पाणी...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
लातूर विभागात होणार चौदाशे शेतीशाळालातूर ः या वर्षीपासून शेतकऱ्यांच्या शेतावर...
कोरडवाहू फळपिकांच्या क्षेत्र वाढीसाठी...नांदेड ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शाश्वत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
पुणे विभागात राष्ट्रीय फलोत्पादन...पुणे   ः कृषी विभागामार्फत चालू वर्षी...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
परभणीत खरिपासाठी ९७ हजार क्विंटल...परभणी ः परभणी जिल्ह्यात २०१९-२० च्या खरीप...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...