agriculture news in marathi, silk carrier become a trouble, Maharashtra | Agrowon

रेशीम कोष वाहतुकीचे तीनतेरा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

रिझर्व्हेशन केलं व मालही परळीच्या रेल्वे स्थानकावर आणला; परंतु जागा न मिळाल्याने आम्ही जवळपास १३ लोक पुढे आलो व आता मागून दुसऱ्या दिवशी माल येणार आहे. त्यामुळं नुकसान होणार हे नक्‍कीच.
- व्यंकट मुंडे, रेशीम उत्पादक, पांगरी, जि. बीड.

बीड : रेशीम कोषाची आवक सुरू झाली अन्‌ रेल्वेने बंगळूरला जाणाऱ्या रेल्वेगाडीच्या मालवाहू बोगींची संख्या चारवरून एकवर आणली. त्यामुळे मराठवाड्यातून रामनगरमला रेशीम कोष घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. गाडीत जागाच मिळत नसल्याने एकतर शेतकऱ्यांचा माल परळीच्या रेल्वे स्थानकावरच अडकून पडतो, किंवा जादा पैसे खर्चून खासगी वाहनाने माल नेण्याशिवाय पर्याय नाही. 

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात रेशीम शेती झपाट्याने विस्तारते आहे. त्यामुळे कोषांच्या उत्पादनात वाढ होत आहे. मात्र रेशीम कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना बेंगलोर जवळ रामनगरम येथे रेल्वेने जावे लागते. नांदेड-बंगळूर या गाडीने बरेच शेतकरी रेशीम कोष घेऊन रामनगरला जातात. मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना औरंगाबाद जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादक या रेल्वे स्थानकावरून आपले कोष रामनगरमला घेऊन जातात. 

आधी नांदेड-बंगळूर रेल्वेगाडीला चार मालवाहतूक बोग्या असायच्या. त्यामुळे रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल सुरक्षित व कमी पैशात स्वत:सोबत रामनगरमला नेता येत होता. मात्र अलीकडील काही महिन्यांत रेल्वे प्रशासनाने केवळ एकच मालवाहतूक बोगी ठेवली आहे. 

या एका बोगीतील जागा नांदेड येथेच भरत असून, परभणी तसेच परळी वै. रेल्वे स्थानकावरील शेतकऱ्यांना माल टाकण्यास जागाच मिळत नाही. त्यामुळे वेळेवर रेशीम कोष बाजारात घेऊन जाणे शक्‍य होत नाही. 
एक दिवस माल रेल्वे स्थानकावर पडून राहिल्यास वजनात घट, दर्जात खराबी झाल्यास मालाला अपेक्षित दरही मिळत नाहीत. जादा दर मिळण्याच्या आशेने शेतकरी रामनगरमच्या रेशीम बाजारपेठेकडे जातात. त्यामुळे राज्य रेशीम विभागाने रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्याची मागणी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे. 

शेतकऱ्यांना फटका 
बंगळूरजवळील रामनगरम रेशीम कोष बाजारपेठ मराठवाड्यातून जवळपास एक हजार किलोमीटर आहे. रेल्वेत जागा मिळत नसल्याने नाइलाजाने शेतकऱ्यांना टेंपो किंवा पिकअप वाहनाने जीव धोक्‍यात घालून रेशीम बाजारपेठेपर्यंतचा प्रवास करावा लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. वाहनात माल न्यावा लागत असल्याने शेतकऱ्यांना भुर्दंडही बसत असून, वेळही जात असल्याचे रेशीम उत्पादकांचे म्हणणे आहे.  

प्रतिक्रिया
जागा न मिळाल्यानं दवनापूर व डाभी येथील पाच ते सहा शेतकऱ्यांचा माल टेंपोनं घेऊन जातोय. एवढा लांबचा प्रवास सोपा नाहीच. पण काय करावं इलाज नाही.  
- अरविंद आघाव, रेशीम उत्पादक, दवणापूर, जि. बीड.

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...