Agriculture News in Marathi, silk farm norms will be relaxed, Said Textile minister Subhash deshmukh, Maharshtra | Agrowon

रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांच्या गटाची अट अंशतः शिथिल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017
मुंबई : रेशीम उद्योगासाठी राज्यातील पोषक वातावरण असून, रेशीम उद्योग हा राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करून देणारा उद्योग आहे.
मुंबई : रेशीम उद्योगासाठी राज्यातील पोषक वातावरण असून, रेशीम उद्योग हा राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करून देणारा उद्योग आहे. रेशीम उद्योग क्‍लस्टर पद्धतीने करण्यासाठी एका गावात शेतकऱ्यांची अट ही अंशतः शिथिल करून पहिल्या टप्प्यात शेतकरी अशी करण्यात येईल, अशी घोषणा वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी केली. 
 
‘महारेशीम अभियान’चे उदघाटन मंत्रालयात श्री. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी श्री. देशमुख म्हणाले, की रेशीम शेतीसाठी लागणाऱ्या सुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येतील. कोष ते कापड प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.
 
त्याचबरोबर रेशीम उद्योगापासून तयार होणाऱ्या कापडाच्या मार्केटिंगसाठी विभागाने प्रयत्न करावेत अशा सूचना देऊन या अभियानाच्या माध्यमातून या वर्षी हजार रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्टे ठेवावे आणि महारेशीम अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी पुढाकार घेणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या समतादूतांना प्रोत्साहन म्हणून पुरस्कार देण्यात यावा, अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी या वेळी केल्या.
 
‘महारेशीम अभियान’च्या उद्‌घाटन कार्यक्रमाला उपस्थित असलेले शेतकरी प्रतिनिधी वसंत रामभाऊ सोनवणे यांच्या हस्ते फीत कापून अभियानाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी रेशीम माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

इतर बातम्या
`शेतकऱ्यांची थट्टा कशाला करता?`पुणे  : डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी...
सातारा जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची... सातारा  ः जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील...
मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये ३२ टक्के... औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाणीसाठा...
तीन जिल्ह्यांत यंदा उन्हाळी पिकांचे... औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
सांगली जिल्ह्यातून १० हजार ६०० टन... सांगली ः दर्जेदार द्राक्षांच्या उत्पादनासाठी...
बियाणे, विमा कंपनीविरुद्ध शेवगावला...नगर ः ‘बीटी कापूस वाणाची लागवड केल्यास हे...
...जीव लावलाय मालकावरीकोल्हापूर : ‘गेली सांगून ज्ञानेश्‍वरी, माणसापरीस...
शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींचा...अकोला : शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत २०१६-...
राज्यातील साडेसात हजारांपेक्षा अधिक...मुंबई : राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्यांना...
जलयुक्तची कामे करा; अन्यथा नोकरी सोडासांगली  ः जिल्ह्यातील पाणीटंचाई...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही कधीही...अकोला : सध्या शेतकरी, तरुण हे सर्वच त्रस्त...
कृषिपंपांच्या वीजदरवाढीविरोधात...मुंबई  ः कृषिपंपांच्या वीजदरवाढीविरोधात...
राळेगणसिद्धीत गावकऱ्यांचा ‘रास्ता रोको’नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी...
‘महाबीज’च्या ‘बीटी’ला बोंड अळीने पोखरलेनागपूर  ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे...
बिगर नोंदणीकृत निविष्ठांची राज्यव्यापी...पुणे : बिगर नोंदणीकृत निविष्ठांची तपासणी...
तापमानातील फरकाचा भाज्या, फळबागांना फटकापुणे : राज्याच्या विविध भागांत दिवसा आणि...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची सव्वाआठ हजार... नगर : जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या वर्षभरात...
शेतकरीप्रश्नी आता देशव्यापी लढा : किसान...अकोला ः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ऐतिहासिक लाॅंग...
तापमानातील तफावत कायमपुणे : राज्याच्या दिवस रात्रीच्या तापमानात चढ-...
नाशिक विभागात शेततळी योजनेच्या... नाशिक  : कृषी विभागाच्या संथ कारभारामुळे...