agriculture news in marathi, silk procurement stopped in jalna, Maharashtra | Agrowon

जालन्यातील रेशीम कोष खरेदी थांबली
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 एप्रिल 2018

व्यापारी यावेत यासाठी प्रयत्न आहेत. उत्पादनातील घट, दर्जेदार व अपेक्षित कोष न मिळणे हेही व्यापारी न येण्यामागचे कारण असू शकते. थांबलेली खरेदी सुरळीत होण्यासाठी पावले उचलली जातील. जास्त व दर्जेदार रेशीम कोष उत्पादनाच्या काळात बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू राहील याची काळजी घेतली जाईल. 
- दिलीप हाके, सहायक संचालक, रेशीम, मराठवाडा, औरंगाबाद
 

जालना : येथील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष बाजारातील कोष खरेदी थांबली आहे. व्यापारी नसण्यासोबतच बहुतांश रेशीम कोष उत्पादकांनी वाढलेले तापमान, पाणीटंचाई यामुळे कोष उत्पादनाला ब्रेक दिल्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसतो आहे. व्यापारी कसे येतील यासाठी प्रयत्न सुरू असताना उत्पादकांची गैरसोय होऊ नये म्हणून संपर्क करणाऱ्या शेतकऱ्यांना व्यापारी उपलब्ध होतील तसे कळिवले जाईल व त्यानुसार कोष बाजारात घेऊन येण्याचे सांगितले जात असल्याची माहिती बाजारपेठेतील सूत्रांनी दिली. 

जालना बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष खरेदीची बाजारपेठ शनिवारी (ता. २१) प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी दोन हजार दोन किलो रेशीम कोषाची खरेदी करण्यात आली. या कोषाला २०० ते ४७५ रुपये प्रतिकिलोपर्यंतचा दर मिळाला. उद्‌घाटनाला कर्नाटकासह मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील जवळपास चौदा व्यापाऱ्यांनी कोषाच्या खरेदीसाठी हजेरी लावली. प्रत्यक्षात केवळ सहा व्यापाऱ्यांनी खरेदीच्या एकूण प्रक्रियेत सहभाग नोंदविला. पहिल्या दिवशी कोष खरेदी झाल्यानंतर बाजारपेठ सुरू राहिले, असे वाटत असतानाच व्यापारी खरेदीसाठी आले नाही. 

दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातील रिलिंग युनिटसाठी लागणारा कोष उपलब्ध असल्याने त्यांना किमान आठवडाभर कोषाची गरज पडणार नाही तर जालन्यातील रिलिंग युनिट अजून सुरू झाले नसल्याची माहिती बाजारपेठेतील सूत्रांनी दिली. त्यामुळे कोष खरेदीसाठी व्यापारीच नसल्याने बाजारपेठेत रेशीम कोष खरेदीला ब्रेक लागला आहे. मराठवाड्यात एप्रिल, मे व जून महिन्यात पाण्याची कमतरता, वाढते तपामान आदी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात कोष उत्पादन घेणे थांबवितात. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर होत असल्याचे दिसते. व्यापारी जसे उपलब्ध होतील तसे कोष उत्पादक शेतकऱ्यांना कळवून कोषाची खरेदी सुरू केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

जालना बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणालीचे साहित्य उपलब्ध असल्याने त्याचा या खरेदी प्रक्रियेत उपयोग करून घेता येईल का याविषयीही चाचपणी केली जात आहे. उन्हाळ्यात कोषाचा दर्जा व उत्पादन अपेक्षित नसणे व त्यामुळे व्यापाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात दर्जेदार माल एकाच ठिकाणावरून न मिळणे, शिवाय कर्नाटकातील निवडणुकाही व्यापाऱ्यांच्या येण्यात अडथळा आणत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पाच कर्मचारी कार्यरत
रेशीम विभागाकडून चार व बाजार समितीचा एक असे पाच कर्मचारी प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम बाजारपेठ सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नियुक्‍त करण्यात आले आहे. त्यामध्ये रेशीम विभागाकडून देण्यात आलेले दोन वरिष्ठ तांत्रिक सहायक, एक ज्येष्ठ क्षेत्र सहायक, एक शिपायाचा समावेश आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...