रेशीम उत्पादकांनी केली विमानवारी

रेशीम उत्पादकांनी केली विमानवारी
रेशीम उत्पादकांनी केली विमानवारी

औरंगाबाद : जिवाची मुंबई करण्यासाठी अनेकजण जातात. पणं आनंद आणि अनुभवासाठी जिवाची विमानवारी करणे तेही शेतकऱ्यांनी हे सहसा पहायला मिळत नाही. मात्र जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्‍यातील तीन रेशीम उत्पादकांनी आपली इच्छेतील 'जिवाची विमानवारी' बंगळुरू ते हैद्राबाद विमानाने प्रवास करून पूर्ण केली.

तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील पळशी गावातील रेशीम उत्पादक शेतकरी रामेश्वर पळसकर यांनी विमानाचा प्रवास केला होता. कसा असतो विमानाचा प्रवास, काय अनुभव नेमका ते पाहण्यासाठी त्या वेळी एकाच रेशीम कोष विक्रीत जवळपास लाखभर रुपये मिळविलेल्या रामेश्वर पळसकरांनी त्या वेळी बंगळुरू ते मुंबई आणि मुंबई ते औरंगाबाद असा विमानप्रवास केला होता. त्यासाठी जवळपास १८ हजार ५०० रूपये त्या वेळी त्यांनी खर्च केले होते.

यंदा पुन्हा तेच कारण आणि तोच योग जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या काऱ्हाळा येथील महादू जिजा सोळंके, महादेव सोळंके व मदन सोळंके या तीन रेशीम उत्पादकच शेतकऱ्यांनी जुळवून आणला. त्यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या विमान प्रवासाच्या कारणाविषयी जाणून घेतले असता आपण कमवितो कशासाठी, आणि इतर फालतू खर्च नसल्याने असलेली ईच्छा आपल्या उत्पन्नातून पूर्ण होत असेल ती करावी याच हेतूने आम्ही बंगळुरू ते हैद्राबाद हा विमान प्रवास करून रेशीम कोष विकून घरी परतल्याचे तिघांनी सांगितले.

मित्राच्या मदतीने काढले तिकीट विमानाचं तिकीट कसं काढावं याची माहिती नसलेल्या या शेतकऱ्यांपैकी महादेव सोळंके यांनी त्यांच्या पुण्यातील मित्रामार्फत ऑनलाइन तिकीट काढून घेतले. तिघांना बंगळुरू ते हैद्राबाद प्रवासासाठी एक तास विमानप्रवास करावा लागला. त्यासाठी २६५० रुपये प्रत्येकी खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. हैद्राबाद ते पुन्हा जालन्यापर्यंत त्यांनी रेल्वेने प्रवास केला त्यासाठी जवळपास पावनेदोनशे रुपये प्रत्येकी खर्च आला. केवळ विमान प्रवासाचा आनंद घ्यायचा असल्याने त्यांनी विमानातील इतर पेड सेवा घेण्याचे टाळल्याचे महादेव सोळंके म्हणाले. यावेळच्या रामनगरच्या फेरीत तिघांनी जवळपास पावनेदोन क्‍विंटल कोषाची विक्री केली. तर त्यांच्या कोषाला ४३० ते ५१५ रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले.

शेतकरी ठरवून काहीच करू शकत नाही. ठरविलं ते करता येईल असं नाही, कधी निसर्ग आणि कधी व्यवस्था त्यामध्ये अडचणं निर्माण करतेच. ईच्छा होती, पैसेही होते, अनुभव घ्यायचा होता. मिळालेल समाधान सुखावून गेलयं. -महादेव बापूराव सोळंके , रेशीम उत्पादक शेतकरी, काऱ्हाळा, ता. परतूर

विमानात प्रवास करून परतल्यापासून नातू जे बी विमान पहातय त्यातून मी प्रवास केला असं सांगतोयं. घरची सारी मंडळी खुश झाली. ईच्छा होतीच ती पूर्ण झाल्याचं समाधान आहे. -महादेव ज्ञानोबा सोळंके , काऱ्हाळा, ता. परतूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com