agriculture news in marathi, Sinha criticised government's demonetisation move | Agrowon

नोटाबंदीचा निर्णय आर्थिक संकट असल्याचे सिद्ध ः यशवंत सिन्हा
पीटीआय
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

या मुद्द्यावर मी बोलायच्याऐवजी जर गप्प बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात मी अपयशी ठरेल. त्यामुळे आता मला बोलावंच लागेल.
-यशवंत सिन्हा, माजी केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली ः देशाचा विकासदर (जीडीपी) वाढविण्याचा प्रयत्न होणे गरजेचे होते. मात्र अशावेळी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर जीएसटीसुद्धा लागू करण्यात आला. यामुळे व्यापाऱ्यांसह जनसामान्यांमध्ये गोंधळ उडाला व भीती निर्माण झाली. अनेक उद्योग बंद पडले, रोजगार क्षेत्रावर परिणाम झाला. नोटाबंदीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली नाही, असे सरकारच्या प्रवक्त्यांकडून सांगितले जात आहे. परंतु सद्यःस्थितीवरून नोटाबंदीचा निर्णय हे आर्थिक संकट असल्याचे सिद्ध झाले आहे, अशा शब्दांत माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

माजी अर्थमंत्री म्हणाले

  • नोटाबंदीचा निर्णय खूप चुकीच्या पद्धतीने लागू केला
  • आर्थिक विकासदरात सातत्याने घट होत आहे
  • खासगी गुंतवणुकीत मोठी घट झाली आहे
  • जवळपास सर्वच क्षेत्रांतील निर्यात ठप्प झाली आहे
  • औद्योगिक उत्पादनाचा वेगही मंदावला आहे
  • कच्चे तेल, इंधनाच्या वाढत्या किमती चिंताजनक
  • कृषीसह उत्पादन, रोजगार आणि सेवा क्षेत्रही संकटात

मला बोलावंच लागेल...
सध्याच्या आर्थिक मंदीसदृश परिस्थितीवर चिंता व्यक्त करून सिन्हा म्हणाले, की आपल्या अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला खूप खाली खेचले आहे. या मुद्द्यावर मी बोलायच्याऐवजी जर गप्प बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात मी अपयशी ठरेल. त्यामुळे आता मला बोलावंच लागेल, असे म्हणत त्यांनी थेट अर्थमंत्री जेटलींवर हल्लाबोल केला.

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...