agriculture news in marathi, Sirpanch Mahaparishad helps to speed up rural developement Says Prataprao Pawar | Agrowon

सरपंच महापरिषदेतून मिळतेय ग्रामविकासाला गती : प्रतापराव पवार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

आळंदी, जि. पुणे : जबाबदार, संवेदनशील सरपंच हे खऱ्या अर्थाने विकासाचे वाहक आहेत. त्यांना प्रशिक्षित करून त्या माध्यमातून सर्वांगीण ग्रामविकास करण्याचे उद्दिष्ट ‘सकाळ’ने समोर ठेवले आहे. ॲग्रोवन सरपंच महापरिषदेतून या विकासाला गती मिळत आहे, असे प्रतिपादन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले. 

आळंदी, जि. पुणे : जबाबदार, संवेदनशील सरपंच हे खऱ्या अर्थाने विकासाचे वाहक आहेत. त्यांना प्रशिक्षित करून त्या माध्यमातून सर्वांगीण ग्रामविकास करण्याचे उद्दिष्ट ‘सकाळ’ने समोर ठेवले आहे. ॲग्रोवन सरपंच महापरिषदेतून या विकासाला गती मिळत आहे, असे प्रतिपादन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले. 

सातव्या ॲग्रोवन सरपंच महापरिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, फोर्स मोटर्सचे प्रदीप धाडीवाल, ‘सकाळ’चे मुख्य संपादक श्रीराम पवार, ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, ॲग्रोवनचे सरव्यवस्थापक प्रमोद राजेभोसले उपस्थित होते.

 श्री. पवार म्हणाले की, ‘सकाळ’ने ७६ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. ‘सकाळ’च्या आतापर्यंतच्या वाटचालीतील ‘ॲग्रोवन’ हा सर्वांत यशस्वी प्रयोग झाला आहे. अभिजित पवार यांच्या प्रयत्नांतून तो अधिक गतिमानतेने पुढे जात आहे. शेतकऱ्यांचे कल्याण कसे होईल, या एकमेव उद्देशाने सुरू केलेल्या या प्रयोगाला राज्यभरातील शेतकऱ्यांनी चांगलेच स्वीकारले आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी सुरू झालेले तनिष्का व्यासपीठ असो की सकाळ रिलीफ फंड असो विकासात्मक बाबींमध्ये ‘सकाळ’ने नेहमीच जबाबदारी स्वीकारली आहे.

सर्वांच्या उत्थानासाठी ‘सकाळ’ गेली आठ दशके कार्यरत आहे. माध्यम म्हणून काम करताना केवळ टीका करण्यापेक्षा प्रत्यक्ष सहभागी व्हा! या भूमिकेतून हे काम सुरू आहे. जलयुक्त शिवार योजनेत ‘सकाळ’ने महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला आहे, याच माध्यमातून राज्यातील ५०० गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न ‘सकाळ’ने मार्गी लावला आहे. जिथे जिथे विकासाची गरज आहे. त्या प्रत्येक ठिकाणी ‘सकाळ’ने योगदान देण्याची भूमिका कायम घेतली आहे. टाटा ट्रस्ट, गुगल यांच्या सहकार्याने तनिष्काच्या ४ लाख महिला तसेच ३ लाख शेतकऱ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवून प्रशिक्षित केले जात आहे.'

‘गावाच्या विकासात तरुण, जबाबदार, संवेदनशील सरपंच मोठे योगदान देऊ शकतो. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंचांना प्रशिक्षित करण्यासाठी ‘सरपंच महापरिषद’ भरविली जाते. त्यातून कृषिकेंद्रित विकासाचा दृष्टिकोन विकसित होतो व त्या माध्यमातून शेतीची प्रगती होते. हा अनुभव यातून येत आहे. जमिनीची सुपिकता या महत्त्वाच्या विषयावर आम्ही आता लक्ष केंद्रित केले आहे. यातून शेतीचे उत्पादन वाढेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि गावाचा विकास साधेल. या दृष्टीने सरपंचांनी महापरिषदेचा पुरेपूर लाभ घ्यावा,' असे आवाहनही त्यांनी केले.

आधुनिक शेतीच्या प्रसारात सरपंचांचे मोठे योगदान 
फोर्स मोटर्स कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (ट्रॅक्‍टर विभाग) प्रदीप धाडीवाल म्हणाले की, मागील ८ वर्षांपासून फोर्स मोटर्स या ॲग्रोवन सरपंच महापरिषदेशी जोडलेली आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांतील १ हजार सरपंच या माध्यमातून एकत्र येतात ही कौतुकास्पद बाब आहे. राज्यभरातील सरपंचांच्या एकत्रित विचारमंथनातून गावाच्या विकासाची दिशा निश्‍चित केली जाते. आधुनिक शेती, स्मार्ट कनेक्‍टिव्हिटी, जबाबदार नेतृत्व या सगळ्यांचा समन्वय सरपंच महापरिषदेतून होत आहे. आधुनिक शेतीसह गावाच्या विकासात सरपंचांचे मोठे योगदान यातून मिळत आहे, असेही ते म्हणाले.

#सरपंच_महापरिषद  #अॅग्रोवन_सरपंच_महापरिषद
see Video : https://www.facebook.com/AGROWON/videos/1681869668539725/

इतर अॅग्रो विशेष
जलदगती मार्गाने निर्जलपर्वाकडे...‘‘पाण्याची उपलब्धता कमी होत जाणे हे हवामान बदलाचे...
पुढचं पाऊलप्र बोधन आणि संघर्षाच्या माध्यमातून गेली चौदा...
नोकरशहांच्या दुर्लक्षामुळे जल...राज्यात दुष्काळग्रस्त गावे वाढत असून, जलाशयांची...
ठिबक सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान : अरुण...राज्यात लागवडीखालील २२५ लाख हेक्टर क्षेत्रांपैकी...
परंपरागत जल व्यवस्थांचा संपन्न वारसा :...परंपरागत जल व्यवस्थांमधून घेण्याजोग्या आणि आजही...
कोरडवाहूचे जल व्यवस्थापन : चिपळूणकर,...पाण्याचे व्यवस्थापन हे केवळ बागायती पिकांसाठी...
फड पद्धतीमुळे झाला कायापालट : दत्ता...फड या जल व्यवस्थापन पद्धतीचे तंत्र अगदी सोपे आहे...
समन्यायी जल व्यवस्थापनाला पर्याय नाही...लोकशाहीकरण वा पुनर्संजीवक विकास ही फुकाफुकी...
डोळ्यांत अंजन घालणारी नागलीची कहाणी :...योग्य पीकपद्धती विकसित केली नाही तर जल व्यवस्थापन...
जल व्यवस्थापनाची सप्तपदी : नागेश टेकाळेनिसर्गदेवतेने दिलेला जलरूपी प्रसाद आज आपण तिने...
जल व्यवस्थापन हाच कळीचा मुद्दा... :...पर्यावरणातील बदल, दुष्काळ, मातीचे बिघडणारे आरोग्य...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दुमदुमला...ज्योतिबा डोंगर, जि. कोल्हापूर  : ‘...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींमुळे...
‘ॲग्रोवन'चा आज १४वा वर्धापन दिन; जल...पुणे : लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबातील घटक बनलेल्या...
यंदा बीटी कापूस बियाणे मुबलक : कृषी...पुणे : राज्याच्या कापूस उत्पादक भागातील...
फलोत्पादन अनुदान अर्जासाठी शेवटचे चार...पुणे : एकात्मिक फलोत्पादन अभियानातून (एमआयडीएच)...
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...