agriculture news in Marathi, SIT not satisfy on police inquiry, Maharashtra | Agrowon

एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर नाराजी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मार्च 2019

नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच.टी. बीटीसंदर्भातील समिती आपला अहवाल या महिन्याच्या अखेरीस सोपविण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर समितीचे प्रमुख पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी गेल्या पंधरवाड्यात गुणनियंत्रन निरीक्षकांची मुंबईत बैठक घेतली होती. विशेष म्हणजे या अहवालात पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्‍त केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच.टी. बीटीसंदर्भातील समिती आपला अहवाल या महिन्याच्या अखेरीस सोपविण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर समितीचे प्रमुख पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी गेल्या पंधरवाड्यात गुणनियंत्रन निरीक्षकांची मुंबईत बैठक घेतली होती. विशेष म्हणजे या अहवालात पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्‍त केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

कापसावर बोंड अळीचा वाढता प्रादुर्भाव, बोंड अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करणाऱ्या ५४ शेतकरी, शेतमजुरांचा फवारणी दरम्यान झालेला मृत्यू आणि हजारांवर बाधित रुग्ण यामुळे शासनाची चिंता वाढली होती. यामागील कारणमीमांसा जाणून घेतली असता राज्यभरात अनधिकृत एच. टी. कपाशी लागवड क्षेत्र वाढीस लागल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. फवारणी बाधित आणि मृतांची संख्या सर्वाधीक असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात तर एच. टी. बिटीचा अनधिकृत पेरा सर्वाधिक असल्याचाही धक्‍कादायक खुलासा केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या पाहणीत झाला होता. याची दखल घेत शासनाने एच. टी. बीजोत्पादन कसे होते, अशा अनधिकृत क्षेत्राला तांत्रिक सहकार्य करणारे कोण? त्यासोबतच बियाणे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचते या सर्वांचा मागोवा घेण्यासाठी कृष्णप्रकाश यांच्या नेतृत्वात विशेष चौकशी पथकाचे गठन केले होते. 

अमरावती विभगीाय कृषी सहसंचालक सुभाष नागरे हे या समितीचे सचिव आहेत. दरम्यान एच. टी. सीडसंदर्भातील या एस.आय.टी.ने भारतीय कृषी संशोधन परिषद (आय.सी.ए.आर.) चे दिल्ली  मुख्यालयात  जात तेथे देखील चौकशी केल्याची माहिती आहे. 

केंद्रीय कापूस संशोधन संस्था अडचणीत
नागपूरातील एका खासगी कंपनीच्या बियाण्यात एच.टी. जनुक आढळल्याचा अहवाल केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने दिला होता. त्यानंतर त्याच संस्थेने दुसऱ्याच दिवशी हा अहवाल फिरविला. त्यामुळे कंपनी आणि सीआयसीआर दोघेही सशंयांच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ‘सीआयसीआर’च्या या दुहेरी भूमिकेवर कारवाईची मागणी कृषी विभागाने आयसीएआरकडे केली आहे. त्यातच कृषी विभागाने पहिल्या अहवालाच्या आधारे कंपनीविरोधात मलकापूर पोलिसात तक्रार दिली होती. परंतु दुसऱ्या अहवालात कंपनीला सीआयसीआरने क्लीन चिट दिल्याने आपल्यावरील गुन्हा रद्द ठरवावा, अशी मागणी करणारी याचिका कंपनीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. 

पोलिस विभाग ठरला अकार्यक्षम
राज्यात एच.टी. बियाण्यांच्या झालेल्या कारवायांपैकी सर्वाधिक १७ कारवाया अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत त्यातील ११ कारवाया एकट्या यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आल्या आहेत. या सर्वच प्रकरणात पोलिस तक्रारी करण्यात आल्या. आरोपी निष्पन्न झाले; पोलिसांनी मात्र खाबुगिरीआड यातील मुख्य आरोपींना संरक्षण दिल्याने एच.टी. पुरवठादारांची साखळी तोडता आली नाही. अहवालात पोलिसांच्या या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह लावण्यात आल्याची माहिती आहे.

इतर बातम्या
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
संत्रा, मोसंबी उत्पादकांना हेक्टरी एक...अमरावती : जिल्ह्यातील तापमान, पाणीटंचाई आणि...
नाशिक जिल्ह्यात भात लागवडीपूर्व कामे...नाशिक  : जिल्ह्यात भात उत्पादन घेणाऱ्या अनेक...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन...नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय...
पाऊसकाळातही मराठवाडा टॅंकरग्रस्त औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५७ लाख...
रत्नागिरी : बळिराजाला आता आर्द्रा...रत्नागिरी :  मृग नक्षत्रात पावसाने पाठ...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ८४...लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर...
सांगलीसह पश्‍चिमेकडे पाऊस सांगली : दोन दिवसांपासून पावसाने पश्‍चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त'च्या ७२ गावांत...परभणी : जिल्ह्यात यंदा मोसमी पावसाचे आगमन उशिरा...
सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा...सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता...
पुणे जिल्ह्यात होणार...पुणे : दरवर्षी शेती कामांसाठी मजुरांची चांगलीच...
बांबू उत्पादनवाढीसाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः बांबू उत्पादनवाढीसाठी भोर, वेल्हा...
नगर जिल्ह्यातील ६३६ वैयक्तिक पाणी योजना...नगर  ः जिल्ह्यात यंदा दुष्काळाचा सर्वाधिक...
पाच जिल्ह्यांतील ६६८ छावण्यांमध्ये चार...औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत...
पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी...मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात...
‘लोकमंगल’प्रकरणी विधान परिषदेत गोंधळमुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना लेखी,...मुंबई ः राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...