agriculture news in marathi, SIT on secret investigation on Pesticide death issue, yavatmal, Maharashtra | Agrowon

एसअायटी पथकाचा अकोला दौरा अाटोपला
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

अकोला ः शेतातील पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन काही शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाल्याप्रकरणी विशेष तपासणी पथकाने (एसअायटी) शुक्रवारी (ता.३) सायंकाळी उशिरापर्यंत संबंधितांच्या भेटी घेतल्या. पथकाने अकोला येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयासह कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधित झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला; तसेच तालुक्यातील अागर येथे एका शेतकरी कुटुंबाला भेटसुद्धा दिली.

अकोला ः शेतातील पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन काही शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाल्याप्रकरणी विशेष तपासणी पथकाने (एसअायटी) शुक्रवारी (ता.३) सायंकाळी उशिरापर्यंत संबंधितांच्या भेटी घेतल्या. पथकाने अकोला येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयासह कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधित झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला; तसेच तालुक्यातील अागर येथे एका शेतकरी कुटुंबाला भेटसुद्धा दिली.

विभागीय अायुक्त पीयूष सिंह यांच्या नेतृत्वात विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, आरोग्य सहसंचालक डॉ. नितीन नाईकवाडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे, नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक विजय वाघमारे, फरिदाबादच्या डायरेक्टोरेट ऑफ प्लान्ट प्रोटेक्शन, क्वारेनटाईन ॲन्ड स्टोरेजचे के. डब्ल्यू. देशकार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांचे पथक शुक्रवारी अकोला दौऱ्यावर होते. 

पथकाने सुरवातीला जिल्हाधिकारी कार्यालयात यंत्रणांकडून अाढावा घेतला. त्यानंतर पथकातील सदस्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली; तसेच त्यांच्यावरील उपचारांबाबतची माहिती संबंधित डॉक्टरांकडून जाणून घेतली. या वेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, तहसीलदार राजेश्वर हांडे व अन्य आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यू झालेले अकोला तालुक्यातील आगर येथील शेतमजूर राजेश मनोहर फुकट यांच्या कुटुंबीयांची विशेष तपासणी भेट घेतली; तसेच विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्राला भेट देऊन माहिती घेतली. समितीचा हा दौरा पूर्ण झाला असून अाता अहवालाकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले अाहे.
 

इतर अॅग्रो विशेष
कुटुंब एेवजी व्यक्ती घटक माणून कर्जमाफी...नागपूर : "शेतकरी सन्मान योजने" साठी आता कुटुंब...
सर्व इथेनॉल खरेदीची केंद्र शासनाची...नागपूर : अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला...
गनिमी काव्याने ‘जाम’पुणे: दूध उत्पादकांनी गनिमी कावा करत राज्यभरात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
`एफआरपी`चे कारखाने संघाकडून स्वागतपुणे : साखर कारखाने अडचणीत असतानाही एफआरपीमध्ये...
पीकविमा सर्व्हर ‘अंडर मेंटेनन्स’अकोला  ः या खरीप हंगामात लागवड केलेल्या...
सेंद्रिय ऊस, हळद, खपली गव्हाला मिळवली...सांगली जिल्ह्यातील आरग येथील जयकुमार अण्णासो...
दूध पावडर बनली आंदोलनाची ठिणगीपुणे : राज्यातील दूध आंदोलनाला दूध पावडरची समस्या...
दूधाला २५ रुपये दर; आंदोलन मागेनागपूर : गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटर...
होले झाले कलिंगड, खरबुजातील ‘मास्टर’पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी येथील केशव होले या...
शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आखावी धोरणे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील शेतकरी,...
‘निधी’चे सिंचनसर्वाधिक धरणांची संख्या असलेल्या आपल्या राज्याचा...
पेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...
ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढनवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘...
स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान...
पावसाचा जोर आेसरलापुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी...
शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी...पुणे ः शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध...
राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडाजळगाव ः राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा निर्माण...
हमीभाववाढीने २०० अब्ज रुपयांचा भारनवी दिल्ली : केंद्र सरकारने खरिपातील १४ पिकांच्या...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू...